नारायण राणेंच्या विजयानंतर वेंगुर्लेत शिंदे शिवसेनेचा जल्लोष

नारायण राणेंच्या विजयानंतर वेंगुर्लेत शिंदे शिवसेनेचा जल्लोष

87971

नारायण राणेंच्या विजयानंतर
वेंगुर्लेत शिंदे शिवसेनेचा जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ४ः रत्नागिरी-सिंधदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांच्या विजयानंतर वेंगुर्ले तालुका शिंदे शिवसेनेतर्फे कॅम्प येथे जल्लोष करण्यात आला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लाडू वाटून व फटाके फोडून घोषणा देत जल्लोष करण्यात आला.
यावेळी शहरप्रमुख उमेश येरम, युवा शहरप्रमुख संतोष परब, महिला शहरप्रमुख अॅड. श्रद्धा बाविस्कर-परब, संजय परब, सुशील परब, बाळा परब, सिल्वान डिसोजा, किरण कुबल, संजय परब, भाऊ वालावलकर, आपा मांजरेकर, गजानन गावकर, मनी रेवणकर, देविदास वालावलकर, मनाली परब, रसिका राऊळ, मनाली गोळम, संजना पिंगुळकर, गीतांजली गावकर, पुंडलिक हळदणकर आदी उपस्थित होते.
यावेळी उमेश येरम यांनी नारायण राणे यांनी या भागातील केलेली विकासकामे यामुळे ते प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही मतदारसंघात राणेंच्या विजयासाठी काम केले. वेंगुर्ले तालुका पर्यटनदृष्ट्या विकसित होत असून पुढील दोन वर्षात राणे यांच्यामुळे वेंगुर्लेचा निश्चितपणे कायापालट होईल, असा विश्वास व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com