पर्यावरणीय समस्या लोकभावनेशी जोडायला हव्या

पर्यावरणीय समस्या लोकभावनेशी जोडायला हव्या

- rat५p१६.jpg-
P२४M८८१२२
अहमदनगर ः जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना धीरज वाटेकर.

पर्यावरणीय समस्या लोकभावनेशी जोडाव्यात

धीरज वाटेकर ः राळेगणसिद्धीत रंगला पर्यावरण कार्यकर्ता मेळावा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः पर्यावरणाच्यादृष्टीने सध्याचा काळ कठीण असून, विषयाचे गांभीर्य कमी झाले आहे. समाजसुधारणांच्या सर्वच क्षेत्रातील अनास्था कमी करण्यासाठी सातत्याने लोकांसमोर विषयाची मांडणी करत राहिले पाहिजे. नदीपासून दूर गेलेल्या लोकांना नदीच्या जवळ आणले पाहिजे. कोकणात वाशिष्ठी नदीला साडी नेसवण्याचा उपक्रम केला. नदीची परिक्रमा केली. खूप पर्यटक, जिज्ञासू तिथे आले होते. गावातील कुतूहल जागृत झालेली लोकं वेगळेपणा पाहायला आली. लोकांना पर्यावरण संवर्धनाशी जोडण्यासाठी पर्यावरणीय समस्या लोकभावनेशी जोडायला हवे, असे प्रतिपादन कोकणातील पर्यावरण अभ्यासक धीरज वाटेकर यांनी व्यक्त केले.
जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्यावतीने आयोजित राळेगणसिद्धी येथे आयोजित ‘वृक्षमित्र’ स्व. आबासाहेब मोरे जयंती व पर्यावरण कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर वनविभाग पालघरचे सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक प्रभाकर म्हस्के, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अहमदनगरचे उपप्रादेशिक अधिकारी चद्रकांत शिंदे, कोकणातील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख, पर्यावरणप्रेमी विलास महाडिक, मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे, सचिव वनश्री मोरे होते. या प्रसंगी वाटेकर म्हणाले, ‘आपल्याकडे नदी कृतज्ञतेचे उत्सव व्हायला हवे आहेत. नद्यांच्या सांस्कृतिक संचितांच्या परिक्रमा व्हायला हव्या आहेत. नदी तिच्या काठाने संस्कृती निर्माण करते. असेच संस्था एक सांस्कृतिक जीवन निर्माण करत असते. मानवी सांस्कृतिक जीवन अधिक विशुद्ध व्हावं यासाठी तुरटीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आवश्यकता असते. असे कार्यकर्ते ‘वृक्षमित्र’ स्वर्गीय आबासाहेबांनी पर्यावरण मंडळाला मिळवून दिले आहेत.
या कार्यक्रमाची सुरवात ‘वृक्षमित्र’ स्वर्गीय आबासाहेब मोरे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या वेळी पर्यावरण मंडळातील सेवानिवृत्त सदस्यांचा सत्कार करण्यात आला. आभार ज्ञानेश्वर कऱ्हाळे (नांदेड) यांनी मानले. कार्यक्रमाला राज्यभरातील नंदूरबार, धाराशिव, यवतमाळ, हिंगोली, वर्धा, सोलापूर, लातूर आदी पंचवीसेक जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com