पंधराव्या फेरीपर्यंत होती आस

पंधराव्या फेरीपर्यंत होती आस

- rat०४p२४.jpg-
२४M८७८३९
रत्नागिरी ः शहरातील एमआयडीसी येथील उबाठा गटातील उपस्थित कार्यकर्ते-पदाधिकारी.
(नरेश पांचाळ, सकाळ छायाचित्रसेवा)
----------
पंधराव्या फेरीपर्यंत होती आस

ठाकरे शिवसैनिकांना नाराज : नेत्यांचीही निराशा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची मतमोजणीवेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते पंधराव्या फेरीपर्यंत आस लावून होते. प्रत्येक फेरीचा निकाल जाहीर होत असताना कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती; पण महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळत गेल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साहही विरत गेला.
भारतीय अन्न महामंडळाच्या एमआयडीसी-मिरजोळे येथे आज झाली. सकाळी भाजप आणि उबाठाच्या पेंडॉलमध्ये शांतता होती. या वेळी उबाठाचे संपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, संजू साळवी, माजी नगराध्यक्ष राजन साळवी, उबाठा शहरप्रमुख प्रशांत साळुखे, महिला व ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थितीत होते. मतमोजणीच्या चौथ्या फेरीत उबाठा गटाचे विनायक राऊत यांनी आघाडी घेतली आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला; मात्र हा आनंद काही काळापुरताच ठरला. पुढे भाजप पक्षाच्या उमेदवारांनी आघाडी घेण्यास सुरवात केली. सतराव्या फेरीत ३८ हजाराची आघाडी घेतली तेव्हा ठाकरे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी प्रतिक्रिया देताना आता सतरावी फेरी झाली आहे. आम्ही पाठी जात आहोत याची आम्हाला जाणीव आहे; परंतु पुढच्या सात फेऱ्यांमध्ये आम्ही पुढे जाऊ, असा विश्वास व्यक्त करत उपस्थित कार्यकर्त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्ते कडक उन्हाच्या झळा सोसत नेत्यांचा विजय साजरा करण्यासाठी दाखल झाले होते. सकाळी सात वाजल्यापासून ते मतांची आकडेवारी ऐकत होते. सतराव्या फेरीनंतर नारायण राणे यांना निर्णायक आघाडी मिळाली आणि उबाठाच्या गटात शांतता पसरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com