सिंधुदुर्ग भाजपच्या विजयाचा शिल्पकार

सिंधुदुर्ग भाजपच्या विजयाचा शिल्पकार

88141

सिंधुदुर्ग भाजपच्या विजयाचा शिल्पकार

प्रभाकर सावंत ः सर्व घटक पक्षांच्या सहकार्यामुळे विजय

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ५ ः जिल्हावासीयांनी भाजपच्या बाजूने भरघोस मतदान दिले असून सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरील जिल्हावासीय जनतेचे असलेले प्रेम दिसून आले. भाजप पक्षाच्या स्थापनेपासून मी बारावा अध्यक्ष असून रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात भाजपच्या कमळ चिन्हावर भाजपचे खासदार निवडून आले आहेत. भाजपच्या विजयाचा हा कळस असून महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या सहकार्यामुळे हा विजय सोपा झाला, अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले.
ते म्हणाले, ‘‘भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून मी पदभार स्वीकारला त्यानंतर पहिल्यांदाच भाजपचा खासदार म्हणून प्रथमच या मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यात यश आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपच्या मागील ११ अध्यक्षांनी संघटनात्मक बांधणी चांगल्या पद्धतीने केली होती. या निवडणुकीत भाजपचे खासदार विजय झाल्यामुळे जिल्हाध्यक्षपदावर मिळालेली संधी व या निवडणुकीतील यश तसेच विजयाचा आनंदोत्सव फार मोठा आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मेहनत केली, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, मनसे, आरपीआय आठवले गट या सर्व महायुतीतील घटक पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी चांगले सहकार्य केले, त्यामुळे भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. कणकवली, सावंतवाडी व कुडाळ या विधानसभा मतदारसंघातील मिळालेले मोठे मताधिक्य राणे यांच्या विजयाचा शिल्पकार ठरले. राणे यांच्यावरील तसेच पालकमंत्री चव्हाण यांनी केलेल्या कामामुळे व भाजपच्या संघटनात्मक ताकदीमुळे जिल्हावासीयांनी भाजपच्या बाजूने चांगला कौल दिला. त्याबद्दल आनंद आहे. अध्यक्षपदावरील हा भाजपचा विजय नेहमी स्मरणात राहील. भाजपच्या माध्यमातून चांगले काम या जिल्ह्यात करू.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com