दाभोळ-२८ धोकादायक इमारतीच्या मालकांना नोटिसा

दाभोळ-२८ धोकादायक इमारतीच्या मालकांना नोटिसा

२८ धोकादायक इमारतीच्या
मालकांना नोटिसा
दाभोळ, ता. ५ : दापोली नगरपंचायतीकडून शहरातील धोकादायक, नादुरुस्त अशा २८ इमारतींच्या मालकांना नोटीस देण्यात आली आहे.
अतिवृष्टी व मान्सूनपूर्वच्या अनुषंगाने दक्षता घेण्याच्यादृष्टीने नगरपंचायतीकडून शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात २८ इमारती धोकादायक आढळून आल्या.
भग्नावस्थेत किंवा पडण्याची शक्यता असलेल्या इमारती पाडून टाकणे अथवा दुरुस्ती करणे गरजेचे आहे; परंतु दापोलीत अनेक जुन्या इमारतींची अजून दुरुस्ती झालेली नाही. या धोकादायक इमारतींमध्ये रहिवासी आहेत. पावसाळा जवळ आला असून पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे कोणतीही आपत्ती घडू नये आणि मनुष्यहानी होऊ नये यासाठी इमारतीमधून दुसरीकडे वास्तव्य करणे गरजेचे आहे. त्यामुळे दापोली नगरपंचायतीने सर्वेक्षण करून नादुरुस्त असलेल्या इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com