खारेपाटणमध्ये मंत्री राणेंचे 
महायुतीतर्फे जल्लोषी स्वागत

खारेपाटणमध्ये मंत्री राणेंचे महायुतीतर्फे जल्लोषी स्वागत

88157
खारेपाटणमध्ये मंत्री राणेंचे
महायुतीतर्फे जल्लोषी स्वागत

जिल्ह्यातील समर्थकांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ५ : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विजयी उमेदवार, केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण चेक पोस्ट येथे भाजप कार्यकर्ते तसेच महायुतीच्या घटक पक्षांतील कार्यकर्त्यांच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत मंगळवारी (ता. ४) सायंकाळी जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राणे समर्थक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्री. राणे यांच्यासोबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणे, आमदार प्रमोद जठार, आमदार नीतेश राणे, माजी आमदार राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, संतोष कानडे, रवींद्र जठार, दिलीप तळेकर, जयेंद्र रावराणे, मनोज रावराणे, रवींद्र शेट्ये, प्रकाश पारकर, रवी पाळेकर, दिगंबर मांजरेकर, बंड्या मांजरेकर, राजन चिके, तुळशीदास रावराणे, भाई नर, अशोक पाटील, पप्पू ब्रम्हदंडे, नाना शेट्ये, तृप्ती माळवदे, खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, रमाकांत राऊत, रफिक नाईक, सुधीर कुबल, सूर्यकांत भालेकर, भाऊ राणे, मंगेश गुरव आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नामदार राणे यांच्या विजयी मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण चेकपोस्ट येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नारायण राणे यांचे खारेपाटण येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेत आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. ‘नारायण राणे आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्यावतीने भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते नारायण राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com