शिक्षकांवरील अन्यायाविरोधात उपोषण

शिक्षकांवरील अन्यायाविरोधात उपोषण

९ (पान ५ साठी)

शिक्षकांवरील अन्यायाविरोधात
महेश मोरे यांचे १२ला उपोषण

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ५ : जिल्हा बँकेच्या खेडमधील शाखेतील एका अधिकाऱ्याकडून खेडमध्ये कर्जदार शिक्षकांना त्रास देण्यात येत आहे. त्यांची तालुक्यातून तातडीने हकालपट्टी करावी व शिक्षकांना न्याय मिळावा म्हणून १२ जूनला खेड तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे शिवसेना कार्यकर्ते महेश मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे.

शिक्षक जीवन कोकणी यांचा यापूर्वी पगार जिल्हा बँकेत होता. त्या वेळी त्यांनी बँकेकडून पगार तारण कर्ज घेतले होते. त्यानंतर त्यांचा पगार बढतीनंतर एका राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेतील खात्यात जमा होत असे. मधल्या कालावधीत काही कौटुंबिक अडचणीमुळे त्यांचे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून काढलेले कर्ज थकीत राहिले. बँकेने नियमानुसार कारवाई करून कर्ज वसुलीसाठी कोकणी यांची सर्व बँक खाती गोठवली. त्यानंतर जिल्हा बँक उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्या बरोबर आम्ही बैठक घेतली असता त्या बैठकीत कर्जदारांना त्यांना नियमित हफ्ते भरता यावे यासाठी त्यांचा पगार जिल्हा बँकेच्या खेड शाखेत वर्ग करण्यात यावा, अशी सूचना केली. त्या वेळी जिल्हा बँकेत पगार जमा होऊ लागल्यावर त्यांची इतर खाती पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा झाली होती; मात्र त्यानंतरही इतर खाती आर्थिक व्यवहारासाठी खुली करण्यात आली नाहीत तसेच शिक्षकांना त्रास देणारे बँकेचे अधिकारी यांची तालुक्यातून हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी १२ जूनला तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे महेश मोरे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com