पाच हजार झाडे लावण्याचा
कोकण रेल्वेकडून संकल्प

पाच हजार झाडे लावण्याचा कोकण रेल्वेकडून संकल्प

88189

पाच हजार झाडे लावण्याचा
कोकण रेल्वेकडून संकल्प

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः यावर्षीचा जागतिक पर्यावरण दिन कोकण रेल्वेने अनोख्या उपक्रमांनी साजरा केला. कोकण रेल्वेने आपली कार्यालये आणि कोकण रेल्वेच्या मार्गाच्या परिसरात तब्बल ५ हजार झाडे लावण्याचा संकल्प केला. कोकण रेल्वेच्या या उपक्रमाची सुरुवात कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा व वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांच्या उपस्थितीत झाला.
गेल्या काही काळात वातावरणातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. तापमानवाढीचे दुष्परिणाम समोर येत असताना त्यावर उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेत कोकण रेल्वेने यावर्षी एका नव्या संकल्पाची घोषणा केली. कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांच्या संकल्पनेतून कोकण रेल्वेची कार्यालये आणि मार्ग यांच्या परिसरात पाच हजार झाडे लावण्याचे निश्चित करण्यात आले. पर्यावरण दिनाचे औचित्य साधत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी झालेल्या समारंभास व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा, वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, वनसंरक्षक (ठाणे) के. प्रतिभा आदी उपस्थित होते. सगळ्यांनी एकत्र येत शाश्वत विकासासाठी कोकण रेल्वे करत असलेल्या या प्रयत्नांना साथ देण्याचे आवाहन यावेळी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com