कोकण रेल्वेमार्गावर पाच हजार झाडांची लागवड

कोकण रेल्वेमार्गावर पाच हजार झाडांची लागवड

- rat५p२२.jpg-
२४M८८१६९
बेलापूर ः जागतिक पर्यावरणदिनी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा.
--------
‘कोरे’मार्गावर पाच हजार झाडांची लागवड

प्रशासनाचा संकल्प; जागतिक पर्यावरणदिनी प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः कोकण रेल्वेचे मार्ग आणि कोकण रेल्वेच्या कार्यालय परिसरात सुमारे ५ हजार झाडे लावण्याचा संकल्प यंदा जागतिक पर्यावरणदिनानिमित्त रेल्वे प्रशासनाने केला आहे.
बेलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात या उपक्रमाची कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा आणि वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांच्या उपस्थितीत सुरवात झाली.

गेल्या काही काळात वातावरणातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. तापमानवाढीचे दुष्परिणाम समोर येत असताना त्यावर उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेत कोकण रेल्वेने या वर्षी नव्या संकल्पाची घोषणा केली आहे. व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांच्या संकल्पनेतून कोकण रेल्वेची कार्यालये आणि मार्ग यांच्या परिसरात पाच हजार झाडे लावण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पर्यावरणदिनानिमित्त या उपक्रमाला सुरवात करण्यात आली. या वेळी अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, ठाणे वनसंरक्षक के. प्रतिभा आदी उपस्थित होते. सगळ्यांनी एकत्र येत शाश्वत विकासासाठी कोकण रेल्वे करत असलेल्या प्रयत्नांना साथ द्या, असे आवाहन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com