चढ्या दराची प्रतिमा खरेदीसाठी आग्रह कोणाचा

चढ्या दराची प्रतिमा खरेदीसाठी आग्रह कोणाचा

- ratchl५२.jpg ः
२४M८८१३८
चिपळूण - शिव स्वराज्य प्रतिमा
------------
प्रतिमा त्या दराने खरेदीचा आग्रह कोणाचा?

आज शिव स्वराज्य दिनी विराजमान ; चौकशीची मागणी

सकाळ वृत्तसेवा ः

रत्नागिरी, ता. ५ ः शासकीय आदेशानुसार प्रत्येक शासकीय कार्यालयात उद्या गुरूवारी ६ जूनला शिव स्वराज्य दिन साजरा केला जात आहे. त्यासाठी चढ्या दराच्या स्वराज्य प्रतिमा काही ग्रामपंचायतींना विकत घेण्यास भाग पाडण्यात आले. चढ्या दराची प्रतिमा खरेदी न करणाऱ्यांना चौकशी व कारवाईचा धाक दाखवला जात आहे. या प्रकरणाची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कसून चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.

गेल्या तीन वर्षापासून शासकीय कार्यालयामध्ये शिव स्वराज्य दिन साजरा केला जात आहे. यावर्षी स्वराज्य प्रतिमा लावण्याची सूचना शासनाकडूनच देण्यात आली. या स्वराज्य प्रतिमेचा आकार किती असावा, त्याची रक्कम याबाबत कोणतीच स्पष्टता नाही. या बाबींचा आधार घेत प्रथम स्वराज्य प्रतिमा पुरवठा करणारा जवळचा ठेकेदार शोधण्यात आला. त्यानंतर निवड केलेल्या एकाच ठेकेदाराकडून या प्रतिमा ४ हजार रुपये दराने घेण्याचा तगादा लावण्यात आला. ५०० ते १ हजार रुपयांची प्रतिमा ४ हजार रुपये दराने घेण्यास सक्ती केली जात असल्याने त्यास सरपंच संघटनेने विरोध केला. चिपळुणातील सुमारे ५० टक्के सरपंचांनी पंचायत समितीच्या अलिखित आदेशाला केराची टोपली दाखवली. त्यानंतर जे ग्रामसेवक प्रतिमा घेऊन जाणार नाहीत त्यांना केबिनमध्ये बोलावून कारवाईची धमकी देण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. ग्रामनिधी तसेच १५ व्या वित्त आयोगातून होणाऱ्या सर्व खरेदीची चौकशी करू तसेच सरपंच संघटनेलाही बघून घेऊ, असे इशारे काही अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. छत्रपती शिवाजी महारांजाच्या प्रत्येक प्रतिमेपोटी ३ हजारांचा घोळ घालून एकाचवेळी लाखो रुपये कमावण्याचा घाट अशाप्रकारे घातला जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
------------------
ंकोट
ग्रामपंचायतीकडील निधीतून विविध विकासकामे आणि वस्तू खरेदी करण्याचे अधिकार शासनानेच ग्रामपंचायतींना दिले आहेत. त्यावर पंचायत समितीने अतिक्रमण करू नये. ५०० ते १ हजार रुपयास मिळणारी प्रतिमा ४ हजार रुपये दराने ग्रामपंचायतीच्या गळ्यात मारण्याचा प्रकार योग्य नाही.
- किशोर कदम, सरपंच टेरव, चिपळूण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com