उक्षीत टॅंकरच्या अपघाताने रस्ता बंद

उक्षीत टॅंकरच्या अपघाताने रस्ता बंद

उक्षीत टॅंकरच्या
अपघाताने रस्ता बंद
रत्नागिरीः उक्षी येथे टॅंकरचा अपघात होऊन रस्ता बंद झाला होता. चालकाचा वाहनावरील ताबा सुटून टॅंकर त्याचा रस्ता सोडून रस्त्याच्या मधोमध आला. यामुळे उक्षीचा रस्ता बंद झाला आणि वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. ही घटना बुधवारी (ता. ५) सकाळच्या सुमारास घडली होती. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली.
----------
दुचाकीच्या धडकेने
पादचारी जखमी
रत्नागिरीः वेळणेश्वर फाटा येथील रस्त्यावर पादचाऱ्याला दुचाकीने धडक बसली. या अपघातात तरुण जखमी झाला. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. गणेश रावजी कदम (रा. नरवण, ता. गुहागर) असे जखमीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ४) रात्री पावणेनऊच्या सुमारास वेळणेश्वर फाटा येथील रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कदम हे वेळणेश्वर फाटा येथे रस्त्यावर उभे असताना दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली.
-------
नेत्रावती एक्स्प्रेसमधील
प्रवाशाचा मृत्यू
रत्नागिरी ः रेल्वेच्या नेत्रावती एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या तामिळनाडू येथील प्रवाशाच्या छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. बी सुकुमारम् (वय ४२, रा. पेरियार नगर, नॉर्थ विरूता चलम, कडलूर- तामिळनाडू) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ४) रात्री नऊच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बी. सुकुमारम् व त्यांची पत्नी मुंबईहून नेत्रावती एक्स्प्रेसने तामिळनाडू येथे जात होते. संगमेश्वर ते आरवलीदरम्यान त्यांच्या छातीत दुखू लागले. टीसी व प्रवासी डॉक्टर यांनी त्यांना तपासले. ते बेशुद्धावस्थेत होते. त्यानंतर रत्नागिरी येथे उतरून त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
------------
साठरेबांबर येथील
महिलेचा मृत्यू
रत्नागिरीः साठरेबांबर येथील महिलेच्या पायाला सूज येऊन दुखू लागल्याने तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. स्नेहल संतोष लिंगायत (वय ४८, रा. खोचाडेवाडी-साठरेबांबर रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ४) सकाळी साडेसातच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. लिंगायत यांना एक आठवड्यापासून पायाला सूज येऊन दुखत होता. पाली येथे व रत्नागिरीत खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. मंगळवारी पायाची सूज आणि पाय दुखू लागल्याने प्रथम पाली येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com