निवळीतील १८३ गुंठे जागेत साकारणार देवराई

निवळीतील १८३ गुंठे जागेत साकारणार देवराई

- ratchl५५.jpg-
P२४M८८२१७
चिपळूण ः निवळी येथे लोकसहभागातून देवराईची लागवड करताना पदाधिकारी व शासकीय अधिकारी.

निवळीतील १८३ गुंठे जागेत साकारणार देवराई

लोकसहभागातून सुरवात ; १२५ प्रकारची झाडे लावणार

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ ः तालुक्यातील निवळी येथे पर्यावरणदिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात प्रथमच श्री पावणाईदेवी मंदिर बाराआणे देवस्थान कमिटी व नाम फाउंडेशन आणि नाम वनसंजीवन अभियानअंतर्गत देवराई पुनरूज्जीवन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यात लोकसहभागातून प्रथमच मोठ्या प्रमाणात देवराई विकसित केली जाणार आहे. त्यासाठी नाम फाउंडेशनने पुढाकार घेतला असून, १८३ गुंठे जागेत १२५ प्रकारची १ हजार ६०० झाडे लावण्यात येणार आहेत. त्याचा शुभारंभ बुधवारी सकाळी करण्यात आला.
तालुक्यात शासकीय तसेच देवस्थानच्या जागेत पुरातन देवराईचे जंगल आहे; मात्र गेल्या काही वर्षात लोकसहभागातून देवराई विकसित झालेली नाही. या कामी श्री पावणाई देवी मंदिर बाराआणे देवस्थान कमिटीने पुढाकार घेतला. त्यामुळे ग्रामस्थांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्ह्यात प्रथमच अशाप्रकारची देवराई पुनरूञ्जिवित करण्यात येणार आहे. त्यासाठी पावणाई देवी मंदिर ट्रस्टसह रघुनाथ ढोले देवराई फाउंडेशन यांचे सहकार्य लाभणार आहे. त्याप्रमाणे बुधवारी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून देवराई पुनरुज्जीवन कार्यक्रमाला प्रारंभ झाला. देवराईचे झाड सुमारे १५० ते २०० वर्षे तग धरून राहते. येथील देवस्थानच्या जागेत प्रत्येक १० फुटावर देवराई लावण्यात येत आहे. देवराई फाउंडेशन हे रोपे उपलब्ध करून देणार आहेत. नामतर्फे रोपे लावण्यासाठी खड्डे खोदून देण्यात येणार आहेत शिवाय याबाबतचे तांत्रिक मार्गदर्शनदेखील केले जाणार आहे. आवश्यकता भासल्यास सामाजिक वनीकरणदेखील विविध प्रकारची रोपे देणार आहे. सर्वांच्या सहभागातून येथे १२५ प्रकारची १६०० झाडे लावण्याचे नियोजन केले जात आहे.
कार्यक्रमाला कृषी अधिकारी बी. बी. पाटील, सामाजिक वनीकरणचे अर्जुन जाधव, प्रथमेश पोमेंडकर, अशोक भुस्कुटे, अजित जोशी, जलदूत समन्वयक शाहनवाज शाह तसेच निवळी येथील गुलाब सुर्वे, मानकरी अनंत सुर्वे, गावकर लक्ष्मण कोदारे, रावसाहेब सुर्वे, शरद शिगवण, सरपंच शिगवण, अजित सुर्वे, गजानन लोकरे, सुभाष गुरव, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com