हाताची नस कापून तरुणाचा 
परुळेत आत्महत्येचा प्रयत्न

हाताची नस कापून तरुणाचा परुळेत आत्महत्येचा प्रयत्न

हाताची नस कापून तरुणाचा
परुळेत आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ५ः पाट परुळे येथील एका तरुणाने निगुडे येथे काजूच्या बागेत हाताची नस कापून घेत जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी त्याला तात्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दखल केले. त्याची प्रकृती नाजूक असल्याने त्याला अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. बांदा पोलिस घटनास्थळी दखल झाले असून घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे. एकतर्फी प्रेमातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
संबंधित तरुण आज सायंकाळी काजूच्या बागेत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. स्थानिकांनी त्याला तातडीने बागेतून मुख्य रस्त्यावर आणत बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी प्राथमिक उपचार केले. रक्त मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने त्याची प्रकृती नाजूक बनली. त्याला अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बांदा पोलिसात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com