कोकणी विद्यार्थ्यांचा प्रशासकीय सेवेत टक्का वाढवा

कोकणी विद्यार्थ्यांचा प्रशासकीय सेवेत टक्का वाढवा

- rat६p२.jpg-
२४M८८३१५
गुहागर : येथे सामाजिक विकासकेंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना चंद्रकांत भगत.

विद्यार्थ्यांनो प्रशासकीय सेवेत टक्का वाढवा

विवेक तांबे ; गुहागरमध्ये सामाजिक विकासकेंद्राचे उद्घाटन

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ : प्रशासकीय सेवेमध्ये कोकणातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढला पाहिजे यासाठी सामाजिक विकासकेंद्राची मदत होईल. तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या केंद्राचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन मुंबईतील सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेक तांबे यांनी केले.
समता सैनिकदल प्रेरित एसएसडी ट्रस्ट संचलित सामाजिक विकासकेंद्राचे शृंगारतळी, गुहागर येथे त्यांच्या हस्ते उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी सामाजिक विकासकेंद्राच्या नामफलकाचे अनावरण नासिम मालाणी यांच्या हस्ते करण्यात आले. समता सैनिकदलाचे राष्ट्रीय प्रशिक्षक संतोष मोहिते यांनी हे केंद्र सुरू करण्याचे उद्दिष्ट सांगितले. या प्रसंगी ठाणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केंद्राला लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करून दिले. एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत भगत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथील प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात, रत्नागिरी समाजकल्याण निरीक्षक प्रताप कांबळे यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना प्रमुख मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एसएसडी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. जी. बी. राजे यांनी भूषविले. त्यांनी ट्रस्टचे ध्येय, उद्देश आणि भविष्यातील योजना विषद करतांना स्थानिक व्यवस्थापन समितीचे कौतुक केले तसेच स्थापन झालेल्या केंद्राचा तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com