तटकरेंच्या डावपेचासमोर गीतेंचे नियोजन तोकडे

तटकरेंच्या डावपेचासमोर गीतेंचे नियोजन तोकडे

तटकरेंना मिळाली पेण, अलिबागची साथ

रायगड-रत्नागिरी मतदार संघ ; कुणबी समाज गीतेंच्या पाठीशी

मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा

चिपळूण, ता. ६ : अनंत गीते यांनी दापोली आणि गुहागर या दोन मतदार संघाच्या जोरावर यापूर्वी सहावेळा विजय मिळवला. आताही येथील मतदारांनी गीतेंनाच साथ दिली. ही साथ तटकरेंनी पेण, अलिबाग मतदार संघात टाकलेल्या डावपेचासमोर तोकडी पडली.
माजी आमदार संजय कदम यांनी गीतेंसाठी जोरदार प्रचार केला. दापोलीचे आमदार रामदास कदम यांनी गीतेंविरोधात सातत्याने केलेल्या टीकेमुळेही कुणबी मतदारांनी तटकरेंच्या विरोधात मतदान केल्याचे दिसून आले; मात्र मतदानासाठी जेमतेम आठवडा शिल्लक असताना रायगड लोकसभा मतदार संघात इंडिया आघाडीचे अनंत गीते हे हमखास विजयी होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांचा होता. ही चर्चा मतदानानंतरही सुरू होती. प्रत्यक्ष मतमोजणीतून अनपेक्षित निकाल समोर आले. ज्या अलिबाग, पेण विधानसभा मतदार संघातून शेकापच्या जोरावर अनंत गीतेंना आघाडी मिळण्याची खात्री होती त्याच मतदार संघात गीतेंना मोठी हार पत्करावी लागली. सुनील तटकरेंच्या उमेदवारीला पेणमधून भाजपच्या नेत्यांनी जोरदार विरोध केला होता; परंतु तब्बल ४६ हजार ९३६ मतांचे मताधिक्य देत या मतदार संघाने लढतीचे गणितच पालटले. शेकापची सर्वाधिक ताकद असलेल्या अलिबाग-मुरूड मतदार संघात सुनील तटकरेंना ३८ हजार ९९६चे मताधिक्य आहे. श्रीवर्धन हा तटकरे कुटुंबीयांचा बालेकिल्ला मानला जातो. येथील सर्वपक्षीय व सर्व जातीधर्माच्या लोकांनी तटकरेंना अपेक्षित साथ दिली. आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्याचे कडवे आव्हान महाडचे आमदार भरत गोगावले यांच्यासमोर आहे. त्यांनी ३ तटकरेंना ६१६ मतांचे मताधिक्य देण्यात यश मिळवले.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मतदार संघातील मतदारांनी अनंत गीतेंना तब्बल २७ हजार ५९५ चे मताधिक्य देत कुणबी फॅक्टर प्रभावीपणे काम करीत असल्याचे दाखवून दिले. कुणबी समाजाने गीतेंना मोठ्या प्रमाणात मतदान केले. पहिल्या फेरीपासूनच अनंत गीतेंना या मतदार संघात लीड मिळत होता. यात गुहागरचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचेही कौशल्य पणाला लागले होते. भास्कर जाधवांचे नेतृत्व आणि कुणबी समाजाची मिळालेली साथ यामुळे गुहागर मतदार संघाने गीतेंना चांगली मते मिळाली. दापोली मतदार संघात कुणबी आणि मुस्लिम समाजाने गीतेंना साथ दिली. या मतदार संघात सुनील तटकरेंपेक्षा ८ हजार ४३२ जास्त मते शिवसेनेचे अनंत गीते यांना आहेत.
...........
चौकट ४
- २०२४ ची लोकसभा निवडणूक
* अनंत गीते-४ लाख २५ हजार ५६८
* सुनील तटकरे-५ लाख ८ हजार ३५२
* कुमुदिनी चव्हाण-१९ हजार ६१८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com