ठाकर लोककलेतील पारंपरिकता जपा

ठाकर लोककलेतील पारंपरिकता जपा

88357


ठाकर लोककलेतील पारंपरिकता जपा
डॉ. सतीश लळीतः कुडाळात रामा ठाकूरांना ‘समाजभूषण’ प्रदान
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ः ठाकर लोककलेतील पारंपारिकता जतन करणे महत्त्वाचे आहे. आपली बोली, आपल्या लोककला हाच आपला समृद्ध वारसा आहे आणि त्यातील पारंपारिकता जपा. आधुनिकतेच्या सोसापायी त्या विकृत करू नका, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे माजी मुख्य जनसंपर्क अधिकारी व कातळशिल्प संशोधक डॉ. सतीश लळीत यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज संघटनेमार्फत दिला जाणारा वसंतराव गंगावणे ठाकर समाजभूषण पुरस्कार कोनाळकट्टा (ता. दोडामार्ग) येथील रामा ठाकूर यांना डॉ. लळीत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरुप शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे होते. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा आदिवासी गिरिजन सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त गणपत मसगे व सुरेश रणसिंग यांना पत्रकार शेखर सामंत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
समाजभूषण पुरस्कार प्राप्त श्री. ठाकूर यांनी आपल्या मनोगतात पुरस्कार दिल्याबद्दल सर्व समाज बांधवांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘ गेली ३०-३५ वर्षे समाजासाठी जे योगदान दिले, त्याचे आज सार्थक झाले. अत्यंत खडतर परिस्थितीत समाजासाठी योगदान देत असताना समाजाचे भले व्हावे, हाच उद्देश डोळ्यासमोर होता. आजची समाजाची परिस्थिती पाहताना खूप समाधान वाटतेय.’’
या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज मंडळाचे अध्यक्ष भगवान रणसिंग, पत्रकार शेखर सामंत, माजी अध्यक्ष भास्कर गंगावणे, बाळा म्हस्के, सहसचिव उर्मिला यादव, पिंगुळी उपसरपंच सागर रणसिंग उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय ठाकर यांनी, प्रास्तविक मंडळाचे सचिव दिलीप म्हस्के यांनी केले.
आभार विवेकानंद गंगावणे यांनी मानले. या सोहळ्यास याप्रसंगी जिल्ह्यातील ठाकर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com