चिपळुणात प्रभातरोड परिसरात पाणीटंचाई

चिपळुणात प्रभातरोड परिसरात पाणीटंचाई

चिपळुणात प्रभातरोड परिसरात पाणीटंचाई

पाच दिवस नागरिक हैराण; ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ ः शहरातील प्रभातरोड परिसरात पाणीटंचाई जाणवत आहे. महामार्गाच्या कामामुळे पालिकेची जलवाहिनी तुटल्याचे सांगितले जाते. पाच दिवस होऊनही अद्याप या जलवाहिनीची दुरुस्ती न झाल्याने येथील नागरिक हैराण झाले आहेत. पाणीपुरवठ्याबाबत पालिकेने त्वरित हालचाल न केल्यास नागरिक आंदोलन करण्याच्या मनःस्थितीत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी अन्यथा ग्रामस्थांच्या साथीने आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी दिला.

महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामुळे अनेकदा महामार्गालगत असलेल्या जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार घडले. ठेकेदार कंपनीकडून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जात नाही. गेल्या काही दिवसांपासून प्रभातरोड व रॉयलनगर भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महामार्ग रूंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या पालिकेच्या पाणीपुरवठा लाईनचे रोड व सर्विसरोड शेजारील गटार व्यवस्थेच्या मधील भागात स्थलांतरित करण्याचे काम काही ठिकाणी अपूर्ण आहे. नवीन पाणीपुरवठा लाईनचे काम पूर्णत्वास जाण्यासाठी पालिका, प्रांत कार्यालय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच महामार्ग ठेकेदार ईगल कंपनी यांच्यात समन्वय व पाठपुरावा राहिलेला नाही. महामार्ग रूंदीकरणाचे काम चालू असताना अनेकदा जुनी जलवाहिनी फुटते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com