बिबट्यांच्या नखाची विक्री प्रकरणी २ कारवाया

बिबट्यांच्या नखाची विक्री प्रकरणी २ कारवाया

बिबट्यांच्या नखांची विक्री;
चौघांना घेतले ताब्यात
खेड, ता. ६ : बिबट्यांच्या नखाची विक्रीप्रकरणी दोन कारवायामध्ये वन विभागाने नख्यांसह चौघांना ताब्यात घेतले. यामध्ये बिबट्याची आठ नखं जप्त केली. भरणे जाधववाडी आणि संगमेश्वर तालुक्यात या कारवाया झाल्या असून, संशयितांना अटक केली आहे.
चिपळूण वन विभागाला ५ जूनला मिळालेल्या गुप्त माहितीचे आधारे सापळा लावला. भरणे (ता. खेड) गावाच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर जाधववाडी येथे बिबट्याच्या नख्या विक्रीसाठी रिक्षातून येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचला. संशयित रिक्षातून फिरताना दिसले. वन विभागाने त्यांची झडती घेतली. त्यांच्याकडे ४ नखे आढळली. याप्रकरणी दिलीप सावळेराम कडलग (वय ४८, रा. घाटकोपर, मुंबई), अतुल विनोद दांडेकर (३६, चेंबूर, मुंबई), विनोद पांडुरंग कदम (४२, सावर्डे, चिपळूण) यांना ताब्यात घेऊन रिक्षा (एमएच ०३ बीए ९७१२) जप्त केली. तिघां संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.
संशयित अतुल दांडेकर यांनी माहिती दिल्यानंतर आणखी एक प्रकार उघड झाला आहे. त्यावरून साखरपा (ता. संगमेश्वर) येथे सापळा रचून सचिन रमेश गुरव (रा. गोविळ, ता. लांजा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडूनही ४ नखे आणि दुचाकी जप्त केली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वन विभागाच्या स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. संशयितांना न्यायालयात हजर केले असता १० तारखेपर्यंत वन कोठडी सुनावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com