शॉक लागून वायरमन गंभीर जखमी

शॉक लागून वायरमन गंभीर जखमी

88525

निगुडे येथे शॉक लागून
वायरमन गंभीर जखमी
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ६ ः निगुडे-गावठणवाडी येथे पथदीपाच्या खांबावर काम करताना शॉक लागून कंत्राटी वायरमन गंभीर जखमी झाला. गुरुनाथ मंगेश कुडव (रा. इन्सुली, सावंतटेम्ब) असे त्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ५) सायंकाळी घडली.
यावेळी कुडव यांच्यासोबत ग्रामपंचायत कर्मचारी असल्याने अनर्थ टळला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत बांबूने वाहिनीवर अडकलेला त्यांचा हात बाजूला केल्याने ते बचावले. लागलीच स्थानिकांनी जखमीला बांदा येथे उपचारासाठी आणले. तेथून सावंतवाडी येथे अधिक उपचारासाठी हलविले. तेथे उपचार करून त्याला घरी पाठविले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, इन्सुली येथील गुरुनाथ कुडव हे निगुडे येथे कंत्राटी वायरमन म्हणून काम करतात. बुधवारी सायंकाळी ते निगुडे-गावठणवाडी येथे पथदीप दुरुस्तीचे काम करत होते. काम करत असताना त्यांनी वीजपुरवठा बंद केला होता. त्यांच्यासोबत ग्रामपंचायत कर्मचारी सुद्धा होते. कुडव हे तुटलेली वीजवाहिनी जोडण्यासाठी खांबावर चढले. तेथील काम आटोपून उतरण्यासाठी म्हणून झोका काढत असताना त्यांना शॉक लागला.
..
चौकट
महावितरणबाबत
ग्रामस्थांत नाराजी
काम करण्यासाठी खांबावर चढण्याअगोदर कुडव यांनी वीजपुरवठा बंद केला होता; मात्र असे असताना त्यांना शॉक कसा लागला, हा प्रश्न उपस्थित होत आहे. एवढी मोठी घटना घडूनही याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. याबाबत कार्यकारी अभियंता यांना विचारले असता त्यांनीही आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले.
............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com