पाट हायस्कूलमध्ये पर्यावरण दिन साजरा

पाट हायस्कूलमध्ये पर्यावरण दिन साजरा

88597

पाट हायस्कूलमध्ये
पर्यावरण दिन साजरा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ः जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पाट हायस्कूलमध्ये मुलांना पर्यावरणाविषयी माहिती देण्यात आली.
इको क्लब ऑफ मिशन लाईफ या शासनाच्या उपक्रमांतर्गत हायस्कूलमध्ये ५ जून ते ११ जून या कालावधीमध्ये विविध उपक्रमाचे आयोजन केलेले आहे. त्यामध्ये पाच जूनला जागतिक पर्यावरण दिन पर्यावरणाविषयी माहिती देण्यात आली.
मुख्याध्यापक राजन हंजनकर, इको क्लब प्रमुख संदीप साळसकर, यज्ञा साळगांवकर, दीपिका सामंत, जान्हवी पडते, गुरुनाथ केरकर, प्रशांत जाधव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी यज्ञा साळगावकर यांनी रानभाज्यांचे त्याचप्रमाणे वृक्ष लागवडीचे महत्त्व याची माहिती मुलांना सांगितली. शाळेमध्ये यावर्षी जे विविध उपक्रम घेतले जाणार आहेत, त्याविषयीची माहिती मुख्याध्यापक हंजनकर यांनी दिली.
यावेळी चंद्रपूर येथील ताडोबा उद्यान सफरची व्हिडिओ क्लिप दाखविण्यात आली. दुसऱ्या दिवशी बिया संकलन आणि त्याचे रोपण तर तिसऱ्या दिवशी मशागत आणि साफसफाई असे उपक्रम घेण्यात आले. यापूर्वी जे विविध उपक्रम घेण्यात आले, त्यांचे फोटोही स्क्रीनवर मुलांना दाखविले. यावेळी संस्थाचालक आणि सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com