गुरूकृपा कात फॅक्टरीला उत्पादन बंदीचे आदेश

गुरूकृपा कात फॅक्टरीला उत्पादन बंदीचे आदेश

‘त्या’ कात कंपनीला उत्पादन बंदीचे आदेश

वनविभाग; साठा अनधिकृत नसल्याचा मालकाचा दावा

सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. ७ : सांगोला येथील वनविभागाच्या पथकाने विसापूर (ता. दापोली) परिसरातील एका कात कंपनीवर गेल्या महिन्यात छापा टाकल्यानंतर ती सील करण्यात आली आहे. कंपनीमध्ये सापडलेला खैराचा साठा अनधिकृत नसल्याचा दावा मालकाने केला आहे; मात्र चौकशी पूर्ण होईपर्यंत उत्पादन बंद करण्याचे आदेश वनविभागाने त्या कंपनी मालकाला दिले आहे.

विसापूर (ता. दापोली ) परिसरात एका कात कंपनीवर मे महिन्यात वनविभागाच्या सांगोला येथील पथकाने छापा टाकला. सांगोला येथून आणलेला ४७०० किलो खैराचा लाकूड जप्त करण्यात आले आहे. त्याशिवाय कंपनीतील खैर लाकडाचे २४१ नग जप्त करण्यात आले आहेत. कातासाठी बनवलेले ३ हजार ७२० लिटरचे ९३ कॅन जप्त करण्यात आले आहेत. कंपनीमध्ये वनविभागाला सापडलेला खैराचा साठा अधिकृत असल्याचे मालकांनी सांगितले; मात्र वनविभागाने पासाची मागणी केल्यानंतर तो त्यांना दाखवता आले नाही. त्यामुळे नियमानुसार वनविभागाने संबधित कात कंपनी सील केली असून, उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
----------
कोट
संबधित कात कंपनीच्या विरोधात कायदेशीर कारवाई झाली आहे. कंपनीकडे खैर वाहतुकीचा पास किंवा अन्य काही पुरावे असतील तर त्यांना दाखवावे लागणार आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत उत्पादन बंदचे आदेश देण्यात आले आहेत.

--वैभव बोराडे, सहाय्यक वनसंरक्षक, वनविभाग, रत्नागिरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com