लोकसभा निकालातून पवारांची ताकद सिद्ध

लोकसभा निकालातून पवारांची ताकद सिद्ध

88648

लोकसभा निकालातून पवारांची ताकद सिद्ध

नंदकुमार घाटे ः देवगड येथे आनंदोत्सव मेळावा

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ७ ः पक्ष विभाजनानंतरही स्थीर राहून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत पक्षाला मोठे यश मिळवून देऊन आपली ताकद पक्ष प्रमुख शरद पवार यांनी सिध्द केली आहे. राज्यातील जनता श्री. पवार यांच्या पाठीशी असल्याचे यातून दिसून येत आहे. केंद्रीय कृषिमंत्री, संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम आजही लक्षवेधी असल्याचे मत राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी येथे व्यक्त केले. प्रतिकुल परिस्थितीत पक्षाला मोठे यश मिळवून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदनच आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठे यश मिळाले. याबाबत येथील पक्ष कार्यालयात श्री. घाटे यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव मेळावा घेण्यात आला. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना श्री. घाटे बोलत होते. यावेळी मोंड उपसरपंच तथा जिल्हा कोषाध्यक्ष अभय बापट, जिल्हा उपाध्यक्ष दिवाकर परब, तालुका उपाध्यक्ष शामकांत शेटगे, तालुका सरचिटणीस शरद शिंदे, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत पाळेकर, प्रकाश जोईल, नागेश आचरेकर, बशीर शेख, सुमंत वाडेकर, बंटी कदम, फटू मुणगेकर, शिवराम निकम यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. घाटे म्हणाले, ‘‘आपण स्थानिक पातळीवर सुरूवातीपासून राजकारण विरहित काम केले. स्वखर्चातून पक्षासाठी अनेकदा योगदान दिले. प्रेम दिल्याने प्रेम मिळते ही भावना कायम जपली. राजकारणात अनेक चढउतार आले. परंतु, पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचा आज आनंद आहे. एकसंघ राष्ट्रवादी पक्षाच्या विभाजनानंतर पक्षाची डळमळलेली स्थिती असतानाही श्री. पवार यांनी मोठी झेप घेऊन पक्षाला पुन्हा उभारी देण्याचे काम केले. त्यामुळेच आज राज्यभर श्री. पवार यांच्या कुशल नेतृत्वाचा डंका पिटला जात आहे. पक्षाला मिळालेले यश वाखाणण्याजोगे असून सर्व कार्यकर्ते आनंददायी आहेत.’’ यावेळी अभय बापट यांनी, पक्षाच्या विभाजनानंतर कोणाच्या बाजूने रहावे अशी द्विधा मनस्थिती कार्यकर्त्यांची झाली असताना केवळ स्थानिक पातळीवर श्री. घाटे यांचे नेतृत्व मानून त्यांच्या सोबत राहण्याचा माझ्यासह अन्य कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय किती योग्य होता हे आज लोकसभा निकालावरून स्पष्ट झाले आहे. पवार यांची योग्य रणनिती आणि कुशल नेतृत्व यामुळेच पक्षाला मोठे यश मिळू शकले, असे सांगितले. यावेळी अन्य कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक करून आभार श्री. बापट यांनी मानले.
.......................................
चौकट
शरद पवार सहकारातील तज्ज्ञ
राज्यात सहकार शरद पवार यांनी रूजवला. तत्कालीन स्थितीत येथील जिल्हा बँक त्यांच्याच मार्गदर्शनाखाली वाढवली गेली. बँकेवर देवगडमधून त्यावेळी प्रतिनिधी दिले होते. श्री. पवार सहकारातील तज्ज्ञ म्हणून आळखले जातात, असे श्री. घाटे यांनी यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com