हातीव ग्रामपंचायतीत शिवराज्याभिषेक सोहळा

हातीव ग्रामपंचायतीत शिवराज्याभिषेक सोहळा

हातीवमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा

सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ७ ः हातीव ग्रामपंचायतीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५१वा शिवराज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे औक्षण करून साजरा करण्यात आला. या प्रसंगी सरपंच नंदकुमार कदम यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
महाराजांचे कार्य, राज्याभिषेक सोहळा याची माहिती मुख्याध्यापक सुनील करंबेळे यांनी दिली तसेच सरपंच कदम यांनी महाराजांच्या गडकिल्ल्यावरील पाणी नियोजनाचा अभ्यास करून जनतेने प्रत्येक गावातील पाणीटंचाईवर उपाय करणे गरजेचे आहे, असे सांगून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी विद्यार्थी श्रेयश गावडे याने छत्रपती शिवाजी महाराज व कीर्ती पर्शराम, कार्तिकी गावडे हिने जिजाबाई, सोयराबाई यांची वेशभूषा केली होती. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य रिया सुतार, ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी उंडे, तंटामुक्ती अध्यक्ष यशवंत शिवगण, पोलिसपाटील जान्हवी गावडे, अंगणवाडी सेविका मदतनीस, आरोग्य कर्मचारी, कृषिसेवक शिक्षक, ग्रामसेवक शैलेश खरारे, कर्मचारी सुयश घोगले, प्रकाश कोटकर, चैतन्या कदम, ग्रामस्थ, बंधू-भगिनी, विद्यार्थी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com