गुहागर-रेवा नदीचे पात्र केले कचरामुक्त

गुहागर-रेवा नदीचे पात्र केले कचरामुक्त

rat7p21.jpg-
88666
गुहागरः रेवा नदीपात्रात स्वच्छता मोहिमेत सापडलेल्या दारूच्या बाटल्या.
---------------
रेवा नदीचे पात्र झाले कचरामुक्त
पर्यावरण दिनानिमित्त गुहागर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम
गुहागर, ता. ७ः गुहागरवासियांचे तसेच फिरण्याचे, वनभोजनाचे ठिकाण म्हणून बारमाही वाहणाऱ्या रेवा नदीपात्राची ओळख आहे. या नदी परिसरातील अनेक ठिकाणी वनभोजनासाठी आलेली मंडळी कचरा करतात. नदीपात्र कचरामुक्त करण्यासाठी जागतिक पर्यावरणदिनाचे निमित्त साधून गुहागर हायस्कूलमधील माजी विद्यार्थ्यांनी नदीपात्राची स्वच्छता केली.
गुहागरमधील कचरनाथ स्वामी मठ परिसरातून बारमाही रेवा नदी वाहते. गुहागरवासीय गेल्या अनेक पिढ्यांपासून पाहुण्यांना घेऊन वनभोजनासाठी, नदीस्नानासाठी, निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी या नदीपात्राच्या परिसरात फिरण्यासाठी येतात. या ठिकाणी येणारे नागरिक, पर्यटक वापरलेल्या पाण्याच्या, शीतपेयांच्या, दारूच्या प्लास्टिक व काचेच्या बाटल्या, कुरकुरे, वेफर्स आदी खाद्यपदार्थांचे प्लास्टिक रॅपर नदीपात्रातच टाकून देतात. यावर्षी पर्यावरणाला मारक असणाऱ्या या वस्तू नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जमा झाल्या होत्या. श्रीदेव गोपाळकृष्ण विद्यामंदिरमधून १९९२-९३ मध्ये दहावीची परीक्षा दिलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅचने पुढाकार घेऊन जागतिक पर्यावरणदिनी रेवा नदीपात्रात स्वच्छतामोहीम राबवली. जमा झालेले प्लास्टिक व काचेच्या बॉटल तसेच प्लास्टिक पिशव्या जमा करून गुहागर नगरपंचायतीच्या कचरा विलगीकरण केंद्रात जमा केल्या. या मोहिमेत हर्षल बावधनकर, नितीन खानविलकर, पराग मालप, उमेश भोसले, मयुरेश कचरेकर, किरण बावधनकर, समीर गुरव, राजेश तुळसुणकर, अभय साटले आदींनी सहभाग घेतला. दरम्यान ही स्वच्छतामोहीम सुरू होती.

चौकट
वनभोजनासाठी आलेले मित्रमंडळही सहभागी
गुहागर शहरातील राणोबा मित्रमंडळ वनभोजनासाठी त्याच परिसरात आले होते. आपलेच गुहागरमधील काही सहकारी, मित्र स्वच्छता करत असल्याचे त्यांनी पाहिले आणि वनभोजनासाठी आलेल्या राणोबा मित्रमंडळाच्या केदार मालप, मनोज बोले, प्रसाद बोले, विनोद मालप, अमित मालप, मंदार बोले, आशिष वरंडे, आस्वाद वरंडे आदींनी स्वयंस्फूर्तीने अभियानात सहभाग घेऊन मोलाचे सहकार्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com