पावस बसस्थानक प्रवाशांसाठी लवकरच खुले

पावस बसस्थानक प्रवाशांसाठी लवकरच खुले

rat7p24.jpg
88675
पावसः येथील बसस्थानक परिसरात काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे.
------------

पावस बसस्थानक प्रवाशांसाठी लवकरच खुले
पावस, ता. ७ः एमआयडीसीअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या पावस बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसात बसस्थानक प्रवाशांसाठी खुले होण्याची शक्यता आहे.
पावस बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी एमआयडीसीअंतर्गत ९९ लाखाचा निधी मंजूर झाला होता. निवाराशेडचे काम केले असून काही किरकोळ काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. बसस्थानकाजवळ पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नव्याने गटाराचे काम केले आहे. त्याचबरोबर या बसस्थानकाच्या आवारामध्ये वारंवार डांबरीकरण करून बसस्थानकाची प्रत्येकवेळी दयनीय अवस्था होत होती. त्याचा त्रास प्रवाशांना होत होता. नूतनीकरणाच्या कामांमध्ये अंतिम टप्प्यात बसस्थानकाचा परिसर सिमेंट काँक्रिटचा करण्याचा निर्णय करण्यात आला. त्यानुसार बसस्थानकाच्या परिसराचे काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com