आंबा दुकाने हटवा; अन्यथा कारवाई

आंबा दुकाने हटवा; अन्यथा कारवाई

88689

आंबा दुकाने हटवा; अन्यथा कारवाई

सावंतवाडी पालिकेच्या सूचना ः व्यापाऱ्यांमध्ये नाराजी, मुदतीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ ः येथील बाजारपेठेत आंबा विक्रीसाठी बसणाऱ्या विक्रेत्यांना पालिका प्रशासनाने दुकाने हटविण्याची सूचना आज दिली. दुकाने न हटविल्यास कारवाईची भूमिका हाती घेऊ, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले असून या प्रकाराबाबत व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
येथील बाजारपेठेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात आंबे विक्रेत्या महिला रस्त्याकडेला दिसून येतात. आंबा विकण्यासाठी या महिलांना पालिका प्रशासनाने रस्त्याकडेला जागा करून दिली आहे. मुळात नवीन संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या कामाला सुरुवात केल्यानंतर रस्त्याच्या बाजूला विक्री करणाऱ्या विक्रेत्या महिलांना दुसरीकडे जागा दिली होती; परंतु आंब्याच्या सिझनपुरती या महिलांना बाहेर रत्याकडेला बसून आंबे विक्रीस परवानगी दिली होती. ही मुदत एक जूनपर्यंत होती. त्यानंतर या आंबा विक्रेत्यांना अजून दोन वेळा मुदत वाढवून देण्यात आली. ही मुदत आज संपल्याने संबंधित विक्रेत्यांना आंबे विक्री करण्यास मज्जाव करण्यात आला. आंबे विक्री करण्यास लावलेली दुकाने पालिका प्रशासनाने काढण्यास सांगितली. एकूणच या भूमिकेनंतर आंबा विक्रेत्या व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. आंब्याचा सिझन सुरू असल्याने तसेच वटपौर्णिमा सण तोंडावर असल्याने अनेक विक्रेत्यांनी आंबे खरेदी केलेले आहेत. पालिकेने कारवाई केल्यास मोठे नुकसान होणार असे त्यांचे म्हणणे होते. आम्ही तालुक्यातील महिला आहोत. आम्ही सावंतवाडीत विक्री करणार नाही तर अन्य कोठे जाणार, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.
--------------
चौकट
मग ‘त्या’ मागणीचे काय?
दोन दिवसांपूर्वी भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब व माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांना वटपौर्णिमेपर्यंत मुभा द्या, अशी मागणी केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा पालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांना दुकाने हटविण्याच्या सूचना दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
----------------
कोट
व्यापाऱ्यांना दिलेली मुदत आज संपल्याने भूमिका घेण्यात आली आहे. शिवाय व्यापाऱ्यांना कुठलीही मुदतवाढ देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला नाही.
- सागर साळुंखे, मुख्याधिकारी, सावंतवाडी पालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com