महसूल कर्मचाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

महसूल कर्मचाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

महसूल कर्मचारी भेटले जिल्हाधिकाऱ्यांना
विविध समस्यांबाबत चर्चाः प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ७ः महसूल कर्मचाऱ्यांकडील अतिरिक्त कार्यभार कमी करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटनेमार्फत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सत्यवान माळवे यांनी दिली.
महसूल कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध अडचणींबाबत जिल्हाधिकारी यांची आज भेट घेतली. यावेळी जिल्ह्यामध्ये महसूल विभागांमध्ये रिक्त असणाऱ्या पदांचा अतिरिक्त कार्यभार अन्य कर्मचारी यांच्याकडे असल्यामुळे पदभरतीबाबत पाठपुरावा तसेच पदोन्नती करणे, कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय वेळेमध्ये आणि प्राधान्याने देण्याबाबत एक नोव्हेंबर २००५ पूर्वीची जाहिरात केव्हा अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर भरती झालेले कर्मचारी यांच्या जुन्या पेन्शन विषयक कर्मचारी यांच्या प्रस्तावाबाबत आवश्यक कारवाई करणे, श्रीमती पी. एस. कांबळे यांना देय असलेल्या सर्व शासकीय रकमा प्राधान्याने देण्याबाबत कार्यवाही करणे, अनुकंपाचा प्रस्ताव, अधिकारी-कर्मचारी यांच्यामधील संवादाची भाषा सौजन्याची असणे, तसेच राज्य वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ च्या ३१ मे २०२४ च्या पत्राच्या अनुषंगाने वेतन त्रुटीत अव्वल कारकून ३५०० ग्रेड वेतनानुसार आवश्यक प्रस्ताव शासनाला सादर करण्याबाबत चर्चा झाली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीवेळी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना अध्यक्ष सत्यवान माळवे, सरचिटणीस शिवराज चव्हाण, उपाध्यक्ष विलास चव्हाण, कार्याध्यक्ष संभाजी खाडे, कोषाध्यक्ष श्याम लाखे, डीसीपीएस जुनी पेन्शन हक्क संघटना जिल्हाध्यक्ष रमेश कांबळे यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी देखील उपस्थित होते.

चौकट
कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक प्रश्‍नही सोडविणार
जिल्हाधिकारी तावडे यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या समक्ष कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणींबाबत विचारणा केली. एकूणच कर्मचाऱ्यांच्या सर्व मागणीबाबत जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याबाबत सांगितले. यावेळी पदभरतीची अनुषंगाने प्रमोशन, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ, तसेच कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक प्रश्न देखील मार्गी लावणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com