सीड बॅंकेस हातभार लावा

सीड बॅंकेस हातभार लावा

सीड बॅंकेस हातभार लावा

निसर्ग मित्र परिवार ः शालेय विद्यार्थ्यांसह निसर्गप्रेमींना आवाहन

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ७ ः येथील निसर्ग मित्र परिवार या पर्यावरण प्रेमी सामाजिक संस्था असलेल्या संस्थेने मागील वर्षीपासून नवीन संकल्प हाती घेऊन ‘सीड बॅंक’ ही संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यास सुरू केली आहे. ही संकल्पना अधिक व्यापक करण्यासाठी शालेय विद्यार्थी तसेच निसर्ग प्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन संबंधितांनी केले आहे.
जास्तीत जास्त झाडे लावून त्यांचे योग्य प्रकारे संगोपन करणे आणि निसर्गाचा ढासळत चाललेला समतोल राखणे आवश्यक आहे. यासाठी निसर्ग मित्र परिवार ही सामाजिक संस्था गेली अनेक वर्षे वृक्षारोपण, संवर्धन, संगोपन आणि प्रबोधन यासाठी काम करीत आहे. कोकणातील कोकणीमेवा म्हणून ओळखला जाणारा रायवळ आंबा, काजू, फणस, रतांबा, जांभूळ, आवळा, चिंच इत्यादी फळ झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड होऊ लागल्याने त्या सर्व प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. याच झाडांची पुनर्लागवड व्हावी, याच उद्देशाने त्या झाडांच्या बिया निसर्ग मित्र परिवाराकडे जमा केल्यास त्या सर्व प्रकारच्या बियांची रोपे बनविण्यात येणार आहेत. तसेच त्या बियांचे सीडबॉल बनविण्यात येणार आहेत. तसेच त्यांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येणार आहे. तरी या चांगल्या उपक्रमामध्ये सर्वांनी उस्फूर्तपणे सहभागी होऊन खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन निसर्ग मित्र परिवाराने केले आहे. त्या बिया सीड बँकेत जमा करण्यासाठी निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर, सचिव राजेश जाधव, सतीश मदभावे, निकेत पावसकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. खानविलकर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com