अपघातग्रस्ताला धनगर समाजबांधवांची मदत

अपघातग्रस्ताला धनगर समाजबांधवांची मदत

-rat७p२५.jpg -
P२४M८८६८७
राजापूर ः आपद्ग्रस्त जंगले कुटुंबीयांकडे आर्थिक मदत सुपूर्द करताना पाचल पंचक्रोशी धनगर समाजबांधव.
----------
अपघातग्रस्तास धनगर समाजबांधवांची मदत

सामाजिक बांधिलकीचे कौतुक; ठाणे येथे घडली घटना
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ७ ः मुंबई-ठाणे येथे झालेल्या रेल्वे अपघातामध्ये दोन्ही पाय गमावलेल्या कणकवली येथील जगन जंगले या ३० वर्षीय तरुणाला पाचल पंचक्रोशी धनगर समाजबांधवांनी आर्थिक मदतीचा हात पुढे करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. या मदतीमुळे जंगले कुटुंबाला दिलासा मिळाला असून, पाचल पंचक्रोशी धनगर समाजबांधवांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
कणकवली येथील मूळ रहिवाशी असलेले जगन जंगले हे नोकरीनिमित्त ठाणे-कल्याण येथे राहतात. २२ मे रोजी कल्याणहून कामावर जात असताना ठाणे येथे झालेल्या रेल्वे अपघातात त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले होते. फेब्रुवारी, २०२४ मध्येच त्यांचा विवाह झाला होता. या दुर्दैवी घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पाचल पंचक्रोशीच्या धनगर समाजबांधवातर्फे आपद्ग्रस्त जंगले यांना औषधोपचारासाठी रोख २५ हजारांची मदत दिली आहे. मदतीची ही रक्कम नुकतीच जंगले यांच्या वडिलांकडे सुर्पूद केली. या वेळी पाचल पंचक्रोशी धनगर समाजबांधव पांडुरंग गोरे, प्रकाश झोरे, अनंत शिंदे, संजय झोरे, सीताराम बावदाणे, सचिन झोरे, विश्वनाथ कोकरे, जनार्दन झोरे, तुकाराम गोरे, गंगाराम शिंदे, सुधीर कोकरे, मनोहर बोडके, आशिष कोकरे आदी उपस्थितीत होते. या मदतीमुळे त्यांच्यावर योग्य उपचार करणे शक्य झाले आहे. पाचल पंचक्रोशी धनगर समाजबांधवांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com