मुरकर गुरुजी ट्रस्टतर्फे
गुणवतांचा होणार गौरव

मुरकर गुरुजी ट्रस्टतर्फे गुणवतांचा होणार गौरव

मुरकर गुरुजी ट्रस्टतर्फे
गुणवतांचा होणार गौरव
कणकवली ः मुरकर गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट, कणकवलीची सभा नुकतीच विद्यामंदिर प्रशाला, कणकवली येथे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दिवाकर मुरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुरकर गुरुजी चॅरिटेबल ट्रस्टच्या शैक्षणिक मंडळातर्फे वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमावर चर्चा करण्यात आली. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल नुकतेच प्राप्त झाले असून बारावी व दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे महत्त्व, करिअर मार्गदर्शन, इंग्रजी शब्द पाठांतर, शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यक्रमाविषयी चर्चा करण्यात आली. शिष्यवृत्ती परीक्षा प्रमुख म्हणून राजाभाऊ मुंढे यांची तर स्पर्धा परीक्षा प्रमुख म्हणून मोहन कुंभार यांची निवड करण्यात आली. यावेळी शैक्षणिक मंडळाचे चेअरमन अच्युत वणवे, व्हाइस चेअरमन नारायण राणे, सचिव मोहन कुंभार, ज्येष्ठ सदस्य श्री. पारकर उपस्थित होते.
---
सावंतवाडीत भाजपतर्फे
शिवराज्याभिषेक दिन
सावंतवाडी ः शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सावंतवाडी तालुका भाजपच्यावतीने तालुका संपर्क कार्यालयात भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब व जिल्हा चिटणीस महेश सारंग यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी मनोज नाईक, आनंद नेवगी, रवी मडगावकर, विनोद सावंत, गुरू मठकर, सचिन साटेलकर, प्रवीण पंडित आदी कार्यकर्ते उपस्थित होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा देत शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले कार्य आम्ही करू, अशी प्रतिज्ञा उपस्थितांनी घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com