शासकीय गोदामात धान्याला ‘टोका’

शासकीय गोदामात धान्याला ‘टोका’

88736

शासकीय गोदामात धान्याला ‘टोका’

अतिरिक्त साठा ः अधिकाऱ्यांना धरले धारेवर

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ ः जिल्हाधिकाऱ्यांकडून धान्याची मागणी २५० टनाची आणि माल ९०० टन असल्याची शासकीय गोदामात स्थिती आहे. यातच कार्यालयाच्या निष्काळजीपणामुळे या धान्याला टोका लागण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे, या पार्श्वभूमीवर धान्याचा दर्जा तपासण्याबरोबरच याच्या वितरणाबाबत आरोग्य विभागाचा अहवाल घेतला का? असा संतप्त प्रश्‍न माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज महाराष्ट्र वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांना केला. टोकासदृश किटकांच्या त्रासाबाबत उपरकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले व प्रश्न तत्काळ सोडविण्याच्या सूचना केल्या.
नेरूर गोंधयाळेवाडीतील ग्रामस्थांना काही दिवसांपासून एमआयडीसी येथे असेलेल्या धान्य गोदामातून येणाऱ्या किटकांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत या ग्रामस्थांनी १३ मे रोजी गोदाम प्रशासनाला पत्र देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यांनतर ३० मे रोजी गोदामाला धडक देत संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. त्यावेळी या किटकांचा बंदोबस्त करू, अशी ग्वाही गोदाम प्रशासनाने दिली होती; पण त्यावर काहीच कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी पाच जूनला सकाळी गोदामासमोर आमरण उपोषण सुरू केले. त्यावेळी गोदाम साठा अधीक्षक समृद्धी नांदगावकर यांनी किटकांचा बंदोबस्त करू, अशी ग्वाही दिली. मात्र, ग्रामस्थांनी लेखी पत्रानंतरच उपोषण मागे घेतले होते. दरम्यान, आज सायंकाळी प्रभारी विभागीय अधिकारी तृप्ती कोळेकर यांनी कुडाळ वखार केंद्रास भेट दिली. यावेळी श्री. उपरकर यांनी श्रीमती कोळेकर यांच्याशी चर्चा केली. अतिरिक्त माल आम्ही घेत नाही. वरिष्ठांशी आमचं बोलणं झालं आहे, असे पाच जिल्हे माझ्याकडे आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी गोदाम गेल्याने शासनाने महाराष्ट्र वखार महामंडळ गोदामात धान्यसाठा केला, असे कोळेकर म्हणाल्या. या सर्व रहिवाशांना कार्यालयाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रश्न निर्माण झाला. यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी श्री. उपरकर यांनी यावेळी केली. यावेळी नेरूर सरपंच भक्ती घाडीगावकर, दीपक गावडे, बाबल गावडे यांच्यासह शेखर गावडे, मंगेश राऊत, महेश राणे, श्याम गावडे, निलेश गवाणकर, विजय गावकर, कृष्णा मार्गी, अजित मार्गी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com