शासन योजनांपासून कामगार वंचित

शासन योजनांपासून कामगार वंचित

88814

शासन योजनांपासून कामगार वंचित

बाबल नांदोसकर ः साटेली-भेडशीत नोंदणी कार्यालयाचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ८ ः ‘‘कष्टकरी, कामगारांकडे शासन लक्ष देत नाही. शासनाने योजनांमध्ये बऱ्याच जाचक अटी-शर्ती लावून कामगार योजनेपासून वंचित राहील, अशी अवस्था केली आहे,’’ असे प्रतिपादन बांधकाम कामगार कल्याणकारी संघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष बाबल नांदोसकर यांनी केले.
दोडामार्ग तालुक्यात बोडदे ग्रुप ग्रामपंचायत आवाडे येथे बांधकाम कामगार कल्याणकारी संघामार्फत बांधकाम कामगारांना मार्गदर्शनपर बैठक पार पडली. साटेली-भेडशी मधला बाजार येथे नोंदणी कार्यालयाचे उद्‍घाटन सरपंच छाया धर्णे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शासनाने जाहीर केलेल्या योजनांनुसार कामगारांना मिळणाऱ्या योजनांचा लाभ, कामगार नोंदणी-नूतनीकरणामुळे मिळणारे लाभ, ‘ऑनलाइन’ नाव नोंदणी कशी करावी, याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन व माहिती संघटना सहसचिव अनिल कदम यांनी उपस्थित बांधकाम कामगारांना दिली. त्यानंतर शासनाच्या बांधकाम कामगार योजना कामगारांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘आम्ही कामगार’ संघटनेची स्थापना करण्यात आली.
यावेळी नांदोसकर म्हणाले, ‘‘संघटनेमार्फत नोंदणी केल्यानंतर प्रतिवर्षी नूतनीकरण करून घेणे आवश्यक आहे. प्रतिवर्षी कामगारांनी शैक्षणिकसह अन्य लाभांसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. संघटना शासनस्तरावर पाठपुरावा करीत आहे. कामगारांनो संघटनेला सहकार्य करा. संघटना तुमच्या पाठीशी आहे. गेली तीन वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायमस्वरुपी कामगार अधिकारी नाही. त्यामुळे शासनस्तरावर ऑफलाइन कामे प्रलंबित आहेत. कामगारांची बरीच कामे रेंगाळत पडली आहेत. तुटपुंज्या पगारात साहित्य खरेदी करताना कामगारांना कसरत करावी लागत आहे. कष्टकरी, कामगारांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.’’ संघटना सहसचिव कदम, सदस्य राजाराम नाचणकर, संघटना उपसमिती अध्यक्ष रवींद्र चव्हाण, दोडामार्ग संचालक सदस्य जेनिफर लोबो, सदस्य दीपक जाधव, घोटगेवाडी तंटामुक्त समिती अध्यक्ष रुक्मिणी नाईक आदींसह बापू नाईक, शामू शेटये, दक्षता नाईक, कलारीन फर्नांडिस आदी बहुसंख्य कामगार उपस्थित होते. कामगारांनी नवीन नोंदणी व नूतनीकरणासाठी साटेली-भेडशी कार्यालयात दोडामार्ग संचालक लोबो व सदस्य जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com