धामणीतील कामाला गती

धामणीतील कामाला गती

धामणीतील ‘जलजीवन’च्या कामाला गती

संगमेश्वर, ता. ८ ः हर घर नलसे जल या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारने धामणी ग्रामपंचायतीत राबवण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन या योजनेतून २०२३-२४ या आर्थिक वर्षात जवळपास दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या कामांची भाजप तालुका सरचिटणीस अमित ताठरे यांनी पाहणी केली. तालुक्यातील यादववाडी येथील ग्रामस्थांना या योजनेतून लवकरच पाणी मिळणार आहे. ३१ मार्च २०२४ पूर्वी हे काम पूर्ण होणे गरजेचे होते; मात्र अनेक तांत्रिक अडचणींमुळे हे काम संथगतीने सुरू होते. या कामाला पुन्हा एकदा सुरवात झाली आहे. गावातील यादववाडी येथे या योजनेतून काँक्रिट विहिरीसाठी सुमारे ११ लाख आणि जमिनीवरील काँक्रिट पाणी साठवण टाकीसाठी रुपये २.९८ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या पाहणीवेळी ज्येष्ठ ग्रामस्थ आप्पा यादव, सुनील नार्वेकर, शरद यादव, स्वप्नील पाटेकर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com