अरूणा कटारा यांना पीएचडी प्रदान

अरूणा कटारा यांना पीएचडी प्रदान

-rat८p२२.jpg-
OP२४M८८७९७
पुणे : संशोधन प्रकल्प सादर करताना होप फाउंडेशन, फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा अरूणा कटारा.
----------
‘फिनोलेक्स’च्या अध्यक्षा कटारांना
पीएचडीची पदवी प्रदान

रत्नागिरी, ता. ८ : होप फाउंडेशन, फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अध्यक्षा अरूणा कटारा यांना पुण्यातील विश्वकर्मा विद्यापीठाकडून पीएचडी ही पदवी प्रदान करण्यात आली.
अरूणा कटारा यांनी विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे येथील कॉमर्स अँड मॅनेजमेंट या विभागात स्टडी ऑफ अॅडॅप्टिव्ह एज्युकेशनल इनिशिएटिव्हज इन अनएडेड रूरल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशन्स या विषयावर पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. या संशोधन प्रकल्पासाठी गाईड म्हणून डॉ. उमेश पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले. पीएचडी पदवी प्राप्त करून शिक्षणाला वय नसतं या उक्तीची त्यांनी प्रचिती दिली. पीएचडी पदवी प्राप्त झाल्याबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com