-सोनवी पुलाच्या कामाचा भराव नदीपात्रात

-सोनवी पुलाच्या कामाचा भराव नदीपात्रात

-rat८p५.jpg -
२४M८८७६३
संगमेश्वर ः सोनवी नदीतून काढलेला गाळ काठावरच ठेवण्यात आला आहे.
-----------

सोनवी पुलाच्या कामाचा भराव नदीपात्रात

गाळ उपसा करण्याची मागणी : पुराचा फटका बसण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ८ ः सोनवी पुलाच्या नवीन कामामुळे सोनवी नदीमध्ये पुन्हा गाळ आला असून त्याचा फटका पावसाळ्यात दुकानदारांना व घरांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोनवी नदीवर उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या कामासाठी मातीचा भराव नदीमध्ये टाकण्यात आला आहे.
संगमेश्वर येथे सोनवी पुलाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे या कामासाठी खोदाई सुरू आहे. त्यातून येणारी माहिती नदीपात्राशेजारी ठेवण्यात आली होती; मात्र ही माती आता पावसामुळे नदीपात्रात जात आहे तसेच नदीकाठचा गाळ नदीमध्ये गेल्याने या ठिकाणी गाळाने पात्र भरले आहे. गाळ साचल्याने त्याचा फटका माभळे आणि संगमेश्वर येथील काही घरांना व दुकानांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या ठिकाणचा गाळ उपसा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
----------
गर्डर उभारणीसाठी मातीचा भराव

सोनवी नदीवर नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या कामासाठी नदीपात्रात मातीचा भराव करून गर्डर टाकण्याचे काम मार्च महिन्यापासून हाती घेण्यात आले होते. पावसाळा जवळ आल्याने गर्डर टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गर्डर टाकण्यासाठी सोनवी नदीत दगडमातीचा मोठा भराव करण्यात आला होता. या भरावावर लोखंडी पोल उभे करून पुलाच्या गर्डरचे काम पूर्ण करण्यात आले. गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाल्यावर नदीतील मातीचा भराव पूर्णपणे काढणे आवश्यक असताना पुलाच्या ठेकेदाराने नदीतील मातीचा भराव अद्याप हटवलेला नाही. याबाबत नावडी आणि माभळे ग्रामपंचायतीने संबंधित ठेकेदारास पत्र द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com