तळेरे परिसरात दमदार पाऊस

तळेरे परिसरात दमदार पाऊस

88819

तळेरे परिसरात दमदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ८ : तळेरे परिसरात आज दुपारपासून पावसाने दमदार हजेरी लावली. मेअखेरीस मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने मिरगाला जोरदार पाऊस होईल, अशी शक्यता होती; मात्र तळेरे परिसरात मिरग सुखा गेल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांची निराशा झाली.
तळेरे परिसरात मेमध्ये झालेल्या वळवाच्या पावसाने थोडा गारवा निर्माण होऊन नागरिक सुखावले होते; मात्र पुन्हा पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीसुद्धा केली होती, पण पावसाने घेतलेल्या रजेमुळे सर्वत्र पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. आज दुपारपासून पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी चिंतामुक्त झाले असून, शेतीच्या कामांना जोरदार सुरुवात झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com