मालवणात २३ जूनला साहित्य संमेलन

मालवणात २३ जूनला साहित्य संमेलन
Published on

88813


मालवणात २३ जूनला साहित्य संमेलन

अध्यक्षपदी डॉ.रणधीर शिंदे ः ‘बॅ. नाथ पै सेवांगण, ‘समाज साहित्य’चा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.८ : बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथे नाथ पै सेवांगण सभागृहात रविवारी (ता.२३) रोजी एक दिवसीय समाज संवाद साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रणधीर शिंदे तर प्रमुख पाहुणे म्‍हणून डॉ.दत्ता घोलप आहेत, अशी माहिती नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर आणि समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांनी दिली.
या एकदिवसीय संमेलनात व्याख्यान, ग्रंथ प्रकाशन, काव्य पुरस्कार वितरण, खुले कविसंमेलन आदी कार्यक्रम होणार आहेत. संमेलनात संत साहित्याचे आणि साने गुरुजी जीवनचरित्राचे ज्येष्ठ अभ्यासक ॲड. देवदत्त परुळेकर व प्रसिद्ध कवी अजय कांडर यांची प्रमुख उपस्थिती असेल. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शिंदे हे मराठीतील आजचे महत्वाचे समीक्षक असून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील मराठी विभागात प्राध्यापक तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सल्लागार सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तर डॉ. दत्ता घोलप हे भाषा साहित्याचे तरुण संशोधक असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे मराठीचे अध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. संमेलनाच्या उद्‍घाटन सत्रात कवी डॉ. अनिल धाकू कांबळी यांना प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्कार डॉ. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी काही ग्रंथांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच सिंधुदुर्गच्या साहित्य चळवळीला अधिक चालना देणारे ग्रंथ संपादित केल्याबद्दल प्रा.जीजा शिंदे (संभाजीनगर) आणि प्रा. संजीवनी पाटील (वैभववाडी) यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात साने गुरुजी जीवन चरित्राचे ज्येष्ठ अभ्यासक ॲड. देवदत्त परुळेकर यांचे ‘साने गुरुजी समजून घेताना’ या विषयावर विशेष व्याख्यान होईल. तिसऱ्या सत्रात नामवंत कवयित्री आणि पुण्याच्या डेप्युटी कमिशनर अंजली ढमाळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि कवयित्री डॉ.दर्शना कोलते यांच्या प्रमुख उपस्थितीत खुले कविसंमेलन होणार आहे. कोकणातील साहित्य रसिकांनी संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. शिरोडकर आणि श्री मातोंडकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com