राज ठाकरेंच्या वाढदिनानिमित्त
मनसेकडून वृक्षारोपणाचा संकल्प

राज ठाकरेंच्या वाढदिनानिमित्त मनसेकडून वृक्षारोपणाचा संकल्प

राज ठाकरे यांच्या वाढदिनानिमित्त
मनसेतर्फे वृक्षारोपणाचा संकल्प

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ ः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शुक्रवारी (ता. १४) आंबोली जंगल परिसरात व इतर ठिकाणी सुमारे १ हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे. यात काही औषधी वनस्पतींचादेखील समावेश असल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर यांनी दिली.
यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सनी बागकर उपस्थित होते. मानवाने जंगलांमध्ये अतिक्रमण केल्यामुळे वन्यप्राणी मनुष्य वस्तींमध्ये ठाण मांडून बसले आहेत. विकासाच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड सुरू असून, जंगले नष्ट होत आहेत. जंगल संस्कृती टिकली पाहिजे, निसर्ग व पर्यावरण याचा समतोल साधून विकासाचे चक्र गतिमान झाले पाहिजे, या उद्देशाने मनसेतर्फे संपूर्ण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये नवीन झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात जनतेनेही आपला सहभाग दर्शविणे गरजेचे आहे, असे अॅड. केसरकर यांनी सांगितले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व मनसे सहकाऱ्यांनी आपापल्या गावात, परिसरात झाडांची लागवड करावी व या समाजकार्यात नेहमीप्रमाणे आपला प्रत्यक्ष सहभाग दर्शवावा, असे आवाहनही यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. केसरकर यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com