कट्टा येथे बौद्ध महासभेतर्फे ‘श्रामणेर’ शिबिराचे उद्‍घाटन

कट्टा येथे बौद्ध महासभेतर्फे 
‘श्रामणेर’ शिबिराचे उद्‍घाटन

88825

कट्टा येथे बौद्ध महासभेतर्फे
श्रामणेर शिबिराचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ८ : भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा सिंधुदुर्ग व तालुका शाखा मालवणच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कट्टा येथे बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्‍घाटन भंते करुणा महाथेरो व केंद्रीय शिक्षक विद्याधर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी राष्ट्रीय सचिव प्रभाकर जाधव, संघटक विजय जाधव, जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर, जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, भाऊ कासार्डेकर, जिल्हा संस्कार उपाध्यक्ष आर. डी. चेंदवणकर, संरक्षण उपाध्यक्ष दिलीप कदम, प्रचार पर्यटन उपाध्यक्ष भीमराव जाधव, माजी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम, तालुकाध्यक्ष रविकांत कदम, प्रकाश पवार, सूर्यकांत कदम, कणकवली तालुकाध्यक्ष भाई जाधव, सुभाष जाधव, कुडाळ तालुकाध्यक्ष नीलेश वर्देकर, रामचंद्र वालावलकर, आर. डी. कदम, सावंतवाडी तालुकाध्यक्ष विजय नेमळेकर, चंद्रशेखर जाधव, सुनील जाधव, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष चंद्रकांत म्हापणकर, रामचंद्र जाधव आदी उपस्थित होते. या दहा दिवसीय निवासी श्रामणेर शिबिरात सुषमा हरकुळकर, जनीकुमार कांबळे, सत्यवान चेंदवनकर, पं. ध. माणगावकर, विजय हरकुळकर, दीपक कांबळे, राघोजी चेंदवणकर, दीपक कदम, सहदेव कदम, सूर्यकांत कदम, विलास वळंजु, विश्वनाथ कदम, अजय कदम, शंकर कदम, प्रकाश कांबळे आदी केंद्रीय शिक्षक व राज्य पदाधिकारी सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरामध्ये जिल्ह्यातील २० शिबिरार्थी सहभागी झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com