खेर्डी एमआयडीसीत पावसात रस्त्याचे डांबरीकरण

खेर्डी एमआयडीसीत पावसात रस्त्याचे डांबरीकरण

-rat८p२८.jpg-
२४M८८८५२
चिपळूण ः पावसात सुरू असलेले रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम.
---------

खेर्डी एमआयडीसीत पावसात रस्त्याचे डांबरीकरण

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ ः खेर्डी एमआयडीसी कॉलनीत वर्षभरापूर्वी मंजूर झालेल्या एका रस्त्याचे डांबरीकरण भरपावसात करण्याचा प्रयत्न ठेकेदाराने गुरूवारी सकाळपासून सुरू केला; मात्र काम सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी हे काम रोखत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
पावसाळ्याला ७ जूनला प्रारंभ होत असला तरी आपल्याकडे मे महिन्यात अधूनमधून पाऊस कोसळत असल्याने शक्यतो १५ मे नंतर रस्ता डांबरीकरणाची कामे केली जात नाहीत. तशी बांधकाम खात्याकडूनच अधिकृत परवानगी दिली जात नाही; मात्र असे असताना गुरूवारी खेर्डी एमआयडीसी कॉलनीत एका रस्त्याचे डांबरीकरण केले जात होते. मुळातच गुरूवारी सकाळी ढगाळ वातावरण असतानाच दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरवात झाली. वर्षभरापूर्वी मंजूर असलेल्या रस्त्याचा शिल्लक राहिलेल्या भागाचे डांबरीकरण करण्याचा प्रयत्न रस्ता ठेकेदाराकडून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच सुरू होता. मुरादभाई अडरेकर यांनी तेथे भेट देत ते काम थांबवले शिवाय अधिकाऱ्यांनाही याबाबतचा जाब विचारत एमआयडीसीच्या सर्व कामांची माहिती मागवली.
---------
कोट
पावसाळ्यात खेडसह अनेक ठिकाणी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्त्याची कामे सुरू आहेत. अधिकारी मात्र त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आपण या कामाच्या चौकशीची मागणी करणार आहोत.

- मुराद अडरेकर, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष.
----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com