-विरेश्वर कॉलनीतील आरक्षित जागेवर खुले मार्केट

-विरेश्वर कॉलनीतील आरक्षित जागेवर खुले मार्केट

-rat८p३५.jpg-
P२४M८८८९०
चिपळूण ः मोजणी करताना पालिकेचे अधिकारी व कर्मचारी.
-------------

विरेश्वर कॉलनीतील आरक्षित जागेवर खुले मार्केट

चिपळूण पालिका ः पोलिस बंदोबस्तात जागेची मोजणी, तक्रार होण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ ः शहरातील विरेश्वर कॉलनी परिसरातील आरक्षित ३५ गुंठे जागेवर नगर पालिका खुले मार्केट साकारणार आहे. बुरूमतळी येथे नवे मैदान केले जाणार असून, रस्तेही होणार आहेत. यासाठी एकाच मालकाच्या सुमारे १२० गुंठे जागेवर आरक्षण असल्याने त्याचा विरोध आहे. त्यामुळे शुक्रवारी पोलिस बंदोबस्तात सर्व जागांची मोजणी करून नगर पालिकेने हद्द निश्चित केली आहे.
अनेक वर्षापासून विरेश्वर कॉलनी परिसरातील या जागेवर पालिकेचे आरक्षण आहे; मात्र संबंधित जागामालक व कूळ या जागेच्या मोजणीला विरोध करत होते. एवढेच नव्हे, तर वाशिष्ठी नदीतील गाळ टाकण्यासही विरोध केल्याने या जागेचा भराव करण्यात आला नाही; मात्र आता मूळ बाजारपेठेतील अरूंद रस्ते, अतिक्रमण यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता शहरातील नागरिकांसाठी या जागेत खुले मार्केट साकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार याची माहिती मूळ मालकाला देण्यात आली; मात्र ते त्याला सहमंती देण्यास तयार होत नव्हते. त्यामुळे प्रशासनाने पोलिस बंदोबस्त घेऊन याच मूळ मालकाच्या आरक्षित असलेल्या विविध भागातील १२० गुंठे जागेची मोजणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी मोजणी करण्यासाठी सर्व यंत्रणा विरेश्वर येथे आली. याची माहिती जागामालकांना मिळताच त्यांनी तेथे येऊन विरोध करण्याचा प्रयत्न केला; मात्र या जागेचे प्रॉपटीकार्ड हे पालिकेच्या नावे असल्याने तुम्हाला विरोध करता येणार नाही, असे पोलिसांनी त्यांना सांगताच ते तेथून निघून गेले; मात्र त्यांनी आपल्या १२० गुंठे जागेची मोजणी करण्यास विरोध असल्याचे लेखी पत्र पालिकेला दिल्याचे वृत्त आहे. या जागेची मोजणी पूर्ण होताच प्रशासनाने सळ्या लावून आपली हद्द निश्चित केली आहे.
बुरूमतळी येथील जागेत मैदान तयार केले जाणार आहे. त्या जागेचीही मोजणी शुक्रवारी करण्यात आली. हद्द निश्चित झाल्यावर तिथेही सळ्या ठोकण्यात आल्या आहेत. येथूनही त्याच जागामालकाच्या जागेतून रस्ता जाणार आहे. एकंदरीत त्यांच्या १२० गुंठे जागेवर आरक्षण असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आपल्यावर हा अन्याय असल्याचे ते सांगत असून या विरोधात तक्रार होण्याची शक्यता आहे. मोजणी करताना प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, अनंत मोरे, राजेंद्र जाधव, संतोष शिंदे, वलिंद वागंडे, वैभव निवाते, प्रसाद साडविलकर, विनायक सावंत, सचिन शिंदे, रमेश कोरवी आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
--------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com