-मिऱ्या-नागपूर महामार्गावर डोंगराचा भराव

-मिऱ्या-नागपूर महामार्गावर डोंगराचा भराव

-rat८p३७.jpg-
२४M८८९०७
रत्नागिरी: मिऱ्या नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना फिनोलेक्स कॉलनीसमोर डोंगराचा भाग खचून रस्त्यावर आल्याने वाहतूक काही काळ ठप्प होती.
---------

मिऱ्या-नागपूर महामार्गावर डोंगराचा भराव

एकेरी वाहतूक सुरू ; रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : मिऱ्या नागपूर महामार्गाच्या कामाची पहिल्या पावसाने दाणादाण उडवून दिली. महामार्गाचे काम सुरू असताना फिनोलेक्स कॉलनी जवळील वळण काढण्यासाठी कापलेल्या डोंगराचा भराव पावसात खचुन रस्त्यावर आला. यामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. ठेकेदारांच्या जेसीबीने रस्त्यावर आलेला मलबा बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
उद्यमनगर येथील फिनोलेक्स कॉलनीजवळील मोठे वळण काढण्यासाठी समोरचा डोंगर कापण्यात आला आहे. डोंगरातील काढलेला भराव पहिल्याच मुसळधार पावसामुळे मुख्य रस्त्यावर आला. त्यामुळे रत्नागिरीतून गणपतीपुळेकडे जाणारा मार्ग काही काळ ठप्प झाला. त्यानंतर ठेकेदाराने मशिनरी पाठवून हा मार्ग मोकळा करण्याचे काम रात्री सुरू केले होते. त्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. परंतु डोंगर कापल्यामुळे भरावाचा चिखल रस्त्यावर आल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून तो निसरडा झाला आहे. त्यामुळे अपघात होण्याच्या शक्यतेने अनेक वाहनधारक तारेवरची कसरत करून तेथून वाहन हाकत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com