जालगावमध्ये स्वच्छतामोहीम

जालगावमध्ये स्वच्छतामोहीम

जालगावमध्ये
स्वच्छतामोहीम
दाभोळ : दापोली तालुक्यातील जालगाव ग्रामपंचायतीच्यावतीने स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण टप्पा २ कार्यक्रमांतर्गत मान्सूनपूर्व स्वच्छता श्रमदान मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम सकाळी १० वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत होती. यामध्ये सर्व मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालय, बाजार परिसर, सार्वजनिक रस्ते अशा ठिकाणी ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थांच्यावतीने सामूहिकरित्या स्वच्छता करण्यात आली. यात अनेक ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
-----
पावसाळ्यापूर्वी
दापोलीत नालेसफाई
दाभोळ : दापोली नगरपंचायतीकडून पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात येत आहे. ही नालेसफाई जवळपास पूर्ण झाल्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. पावसाचे आगमन कोणत्याही दिवशी कधीही होऊ शकते. नालेसफाई नसेल तर सर्व पाणी रस्त्यावर येऊन रस्त्यांना नदीचे स्वरूप येईल. यामुळे अपघात व जीवितहानी होऊ शकते तसेच रोगराईदेखील पसरू शकते. त्यामुळे नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाने शहरातील साफसफाईसह नालेसफाईचे काम हाती घेतली आहे. नालेसफाईचे काम ९९ टक्के पूर्ण झाले असून, जिथे गरज आहे तेथे पुन्हा सफाई करण्यात येत असल्याची माहिती स्वच्छता विभागाकडून देण्यात आली आहे.

-------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com