स्वराज्य संस्थेतर्फे समाजभूषण पुरस्कारांचे वितरण

स्वराज्य संस्थेतर्फे समाजभूषण पुरस्कारांचे वितरण

89002

स्वराज्य संस्थेतर्फे समाजभूषण पुरस्कारांचे वितरण
रत्नागिरी, ता. ९ : येथील स्वराज्य संस्था सामाजिक क्षेत्रात सेवाभावी वसा घेऊन कार्य करत आहे. अनेक उपेक्षित घटकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असे कार्य करत असताना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्या मान्यवर व्यक्तींना छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनी समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचेही कौतुक करण्यात आले.
हा कार्यक्रम रा. भा. शिर्के प्रशालेच्या रंजन सभागृहात झाला. या वेळी बॅंक ऑफ इंडियाचे माजी व्यवस्थापक शांताराम भुरवणे, रोटरी मिडटाउनचे माजी अध्यक्ष संजीव सुर्वे, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, सुवर्णा चौधरी, ज्योती सुर्वे, अध्यक्ष जितेंद्र शिवगण, उपाध्यक्ष शेखर रेवणे, सेवानिवृत्त अभियंता नागेश कांबळे, माजी नगरसेवक सलील डाफळे, पुरस्कार समिती अध्यक्ष सत्यवान कोत्रे, विजय पाडावे, संस्कृती फाउंडेशनचे संस्थापक राजेश गोसावी उपस्थित होते. या वेळी स्वराज्य संस्थेच्या कष्टकरी समाज या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थी केयूर ढेपसे, ओम भोरे, श्रुती चव्हाण, ओम चौधरी, स्वरा गोताड, वैष्णवी बाणे, ज्ञानल धामणस्कर, श्रुती घडशी, आर्यन सालम, योगेश कामत, श्रवण कळंबटे, कस्तुरी कळंबटे, लावण्या कीर यांचा गौरव केला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अभिषेक खंडागळे, प्रवीण बारगोडे, सुरेश राडये, राजन फगरे, शंकर करंडे, गार्गी ढेपसे, सुविधा वाडेकर, संतोष रेवणे, कुशल जाधव, शुभवम वारसे, मनिष आग्रे, रामदास चव्हाण यांनी मेहनत घेतली.

चौकट
यांचा झाला सन्मान
समाजभूषण पुरस्काराने सामाजिक कार्यकर्ते प्रबोधनकार मारूतीकाका जोशी (साखरपा), यशवंत बिर्जे (रत्नागिरी), शंकर बैकर (चिपळूण), वैशाली घडशी (रत्नागिरी), अनंत ढेपसे (रत्नागिरी), तुकाराम घवाळी (रत्नागिरी), श्रद्धा कळंबटे (रत्नागिरी), आत्माराम धुमक (लांजा), अॅड. तु. ल. डाफळे (खेड), काशिनाथ पोसकर (दापोली), कमलाकर मसुरकर (असुर्डे, संगमेश्वर), सीताराम सांडम (लांजा), विलास कोळपे (देवरूख), मधुकर पवार (राजापूर), महादेव साठले (गुहागर) यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com