महायुतीला गती, आघाडीची आली घडी

महायुतीला गती, आघाडीची आली घडी

सकाळ विशेष-------------लोगो

महायुतीला गती, आघाडीची आली घडी
रत्नागिरी जिल्ह्यात दगाफटक्याचा आरोप; संघर्षाची चिन्हे

इंट्रो
लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या चर्चांना रंगत आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर वगळता अन्य चार विधानसभा मतदार संघात लोकसभेतील विजयी उमेदवारांना मताधिक्य मिळालेले नाही. यावरून कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना भक्कम असल्याचे चित्र तयार झाले; परंतु मागील निवडणुकीतील मताधिक्याची आकडेवारीवर नजर टाकली तर ठाकरे सेनेलाही ही निवडणूक विचार करायला लावणारी आहे. कारण, ठाकरे सेनेच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये घट झाली आहे. त्यामुळे मिळालेला दिलासा ठाकरे सेनेसाठी अळवावरचे पाणी ठरू शकतो. हे चित्र भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उतरणाऱ्या विद्यमान आमदारांना त्याची व्यूहरचना बदलायला लावणारी आहे. गुहागरमध्ये आमदार भास्कर जाधव यांनी ठाकरे सेनेच्या उमेदवाराला चांगली मते मिळवून देतानाच आपली बाजू भक्कम असल्याचे दाखवून दिले आहे तर खेड-दापोलीत शिंदे सेनेचे आमदार योगेश कदम यांच्याकडून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरेंना अपेक्षित मताधिक्य मिळवून देता आलेले नाही. चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित दादा गट) शेखर निकम आणि रत्नागिरीत शिंदे शिवसेनेचे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून महायुतीचे उमेदवार नारायण राणेंना मते मिळवून देण्यात आली की नाही, याबाबत शंका घेतली जात आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना मताधिक्य मिळाले. परंतु लांजा-राजापूरमध्ये ठाकरे सेनेचे आमदार राजन साळवी यांना मागील निवडणुकीच्या तुलनेत राऊत यांना मताधिक्य देता आलेले नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आपापले गड राखण्यासाठी विद्यमानांना वेगळी गणिते मांडावी लागणार आहेत.....!

--------
rat९p२६.jpg-
89018
शेखर निकम

इंट्रो

चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना मताधिक्य मिळाले नाही; मात्र विनायक राऊत यांना मिळालेली मते ही महाविकास आघाडीच्या प्रयत्नामुळे मिळाली की भाजप विरोधी असलेल्या वातावरणाचा फायदा शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांना झाला याबाबत आता चर्चा सुरू आहेत. महायुतीतच संघर्ष झाला आणि तो होण्याचीच शक्यता अधिक. चिपळूणचे मैदान आता आमदार शेखर निकम यांच्यासाठी सोपे नाही हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे. निवडणुकीत मते विकत घेता येतात; पण सहानुभूतीला मूल्य नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती विधानसभेतही कायम राहील. ती महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पथ्थ्यावर पडणार आहे.
- मुझ्झफर खान, चिपळूण


------
चिपळुणात महायुतीत वाद की, संघर्ष?

राऊतांचे मताधिक्य केवळ दलित, मुस्लिम मतांचे

महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची उमेदवारी निवडणुकीच्या आधीच निश्चित झाली होती. महाविकास आघाडीने त्यांचा प्रचार ही सुरू केला होता. महायुतीकडून भाजपाचे नारायण राणे यांना उमेदवारी मिळेल की, शिंदे गटाचे भैय्या सामंत निवडणुकीच्या रिंगणात असतील याबाबत काहीही निश्चित नव्हते. अखेरच्या क्षणी राणे यांची उमेदवारी जाहीर झाली. तोपर्यंत राऊत यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. मागील निवडणुकीत राऊत यांनी चिपळूणमधून ५७ हजाराचे मताधिक्य घेतले होते. या वेळी हे मताधिक्य ६० हजारच्या पुढे जाईल, असे वातावरण होते. कारण, दलित आणि मुस्लिम मतदार भाजपवर नाराज होता. तालुक्यातील ८४ गावे चिपळूण विधानसभा मतदार संघात येतात. तालुक्यात १७१ बूथ आहेत. यातील ४० बूथ चिपळूण शहरामध्ये आहेत.
यातील बहुतांशी गावांमध्ये दलित आणि मुस्लिम वस्ती आहे. तेथे भाजप उमेदवाराला फारशी मते मिळाली नाहीत. ही सगळी मते विनायक राऊत यांना मिळाली. ८४ गावांपैकी निम्म्या गावातील दलित आणि मुस्लिमांची मते गृहित धरली तर एका गावातून किमान पाचशेचे मताधिक्य विनायक राऊत यांना मिळाले आहे. म्हणजेच विनायक राऊत यांना मिळालेले १९ हजाराचे मताधिक्य हे केवळ दलित आणि मुस्लिम मतांचे आहेत का ० असाही प्रश्न आता विचारला जात आहे. हा मतदार पूर्वी आमदार शेखर निकम यांच्याकडे होता.
निकम यांनी चिपळूण मतदार संघातून दोनवेळा विधानसभेची निवडणूक लढवली पहिल्यावेळी ते पराभूत झाले दुसऱ्यावेळी सर्व प्रकारची ताकद वापरून त्यांनी विजय मिळवला. स्वच्छ प्रतिमा आणि सुसंस्कृत नेता अशी त्यांची ओळख होती; मात्र शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर मतदारसंघात वेगळे चित्र तयार झाले आहे. शेखर निकम यांना तोडीस तोड आव्हान देण्यासाठी प्रशांत यादव निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी शेखर निकम यांच्याकडे जे गुण आणि यंत्रणा आहे तेच गुण आणि यंत्रणा यादव यांच्याकडे आहे शिवाय ठाकरे गटाबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आघाडी झाली तर ठाकरे आणि पवार यांना असलेली सहानुभूती यादव यांच्या पथ्थ्यावर पडणार आहे. भास्कर जाधव ही या मतदार संघातून इच्छुक आहेत.
..........
कोट
चिपळूण विधानसभा मतदार संघाची निवडणूक जिंकणे इतके अल्प उद्दिष्ट ठेवून चालणार नाही. पूर्ण मतदार संघाची घडी विस्कटलेली आहे. विकासाचे दावे केले जात असले तरी सामान्य माणूस त्रस्त आहे. कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये सामान्य लोकांना सहज न्याय मिळत नाही. त्यामुळे चिपळूण साठी खमक्या लोकप्रतिनिधींची गरज आहे.
- सुनील कुलकर्णी, विभागप्रमुख शिवसेना चिपळूण
-------

rat९p२७.jpg-
M89019
डॉ. राजन साळवी

राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघ ...........लोगो

इंट्रो
लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या मताधिक्याने पुन्हा एकदा राजापूर विधानसभा मतदार संघ शिवसेनेचा (उबाठा) बालेकिल्ला असल्याचे अधोरेखित झाले आहे; मात्र, पारंपरिक राजकीय विरोधक असलेले काँग्रेस सोबत असतानाही गतवेळच्या तुलनेमध्ये या वेळी मताधिक्क्यामध्ये झालेली घट आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची (उबाठा) चिंता वाढवणारी आहे. महायुतीतील घटकपक्ष असलेल्या भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) यांनी राजापूर जिंकण्यासाठी आतापासून सुरू केलली मोर्चेबांधणी आणि गतवेळचा प्रतिस्पर्धी आणि सध्याच्या महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसने या मतदार संघावर केलेला दावा पाहता सलग चौथ्यांदा राजापूर विधानसभा मतदार संघावर भगवा फडकविणे शिवसेनेसाठी (उबाठा) आव्हानात्मक ठरणार आहे.

- राजेंद्र बाईत

---------
आघाडील मित्रपक्षच शड्डू ठोकून
भाजपतर्फे राणे आक्रमक ;साळवींपुढे आव्हान
गेली तीन दशकांहून अधिक काळ राजापूर विधानसभा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. ग्रामपंचायतींपासून थेट खासदारकीच्या मध्यमातून संसदेपर्यंत राजापूर मतदार संघात शिवसेनेचे एकहाती वर्चस्व राहीले आहे. शिवसेनेच्या या वर्चस्वाला पारंपरिक विरोधक असलेल्या काँग्रेसने सातत्याने आव्हान दिले आहे. त्यामध्ये काही वेळा काँग्रेसला यशही मिळालेले आहे. त्यातून, राजापूर मतदार संघामध्ये शिवसेना विरूद्ध काँग्रेस अशीच सातत्याने राजकीय लढत राहिली आहे; मात्र, गेल्या काही वर्षामध्ये मतदार संघातील शिवसेना विरोधी पक्षांनी आपली ताकद वाढवण्याला सुरवात केली आहे. माजी आमदार हुस्नबानू खलिफे, जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आपली ताकद राखून आहे तर, दांडगा जनसंपर्क असलेले अजित यशवंतराव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी प्रगतीपथावर आहे. शिवसेना नेते किरण सामंत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (शिंदे गट) विकासकामांच्या माध्यमातून गावा-गावात पोहचली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक झालेल्या पक्षप्रवेशांनी शिवसेना (शिंदे गट) ताकद वाढली तर शिवसेना (उबाठा) यांची ताकद काहीअंशीने कमी झाली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशाने भाजपाला बळ मिळाले आहे. मनसेही रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. एकंदरीत, या सार्‍यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने राजापूर मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातून शिवसेनेसमोर (उबाठा) निर्माण झालेल्या आव्हानामध्ये गतवेळच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये या वेळी सुमारे १३ हजार मतांची घट झाली आहे. महायुतीतील घटक पक्षांच्या आव्हानाचा सामना करताना शिवसेना (उबाठा) गटाला महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसने मतदार संघावर केलेला दावाही दुर्लक्षित करून चालणार नाही. आमदार राजन साळवी यांचा वैयक्तिक दांडगा जनसंपर्क, जोडलेला जनाधार, तळागाळात रूजलेली संघटना, संघटनात्मक मजबूत ताकद यांचा शिवसेनेला फायदा होणार आहे. तरीही विरोधकांचा हल्लाबोल परतवून सलग चौथ्यांदा राजापूरचा गड स्वतःकडे राखणे शिवसेनेला (उबाठा) यावेळी आव्हानात्मक राहणार आहे.

-------------------

rat९p२८.jpg-
89020
योगेश कदम

इंट्रो

रायगड लोकसभा मतदार संघात महायुतीचे खासदार सुनील तटकरेंचा विजय झाला हे जरी खरे असले तरी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर या दोन्ही मतदार संघात मतमोजणीदरम्यान काही हजारात महाविकास आघाडीचे अनंत गीते हेच पुढे होते. मतमोजणीनंतर स्पष्ट झालेल्या आकडेवारीत रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातून महायुतीला आघाडी मिळाली; मात्र खेड-दापोली-मंडणगड या तीनही तालुक्यामधील मतांची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत आमदार योगेश कदम यांना अधिक मेहनत घ्यावी लागणार हे निश्चित आहे.

- सिद्धेश परशेट्ये

-------------
खेड- दापोलीतील चित्र महायुतीसाठी चिंता वाढवणारे
गितेना मिळालेली आघाडी मोडणार कशी;धृवीकरण फॅक्टरही

आमदार कदम यांनी शिंदे सरकारच्या काळात अनेक विकासकामे खेडसह दापोली व मंडणगड या तालुक्यात आणली आहेत. शिवसेनेचे माजी आमदार व सद्यस्थितीत भाजपवासी झालेले सुर्यकांत दळवी यांनी गेल्या २५ वर्षात ज्या कामांची फक्त आश्वासने दिली होती. ती कामे आमदार कदम यांनी साडेचार वर्षांच्या कालावधीत करून दाखवली. मागीलवेळी (२०१९) निवडणुकीत भाजप -शिवसेना युती असुनही भाजपच्या माध्यमातून आमदार कदम यांच्या विरोधातच प्रचार झाला. काही मोजक्याच भाजपच्या एकनिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे काम केले. सारेच पक्ष विरोधात असतानाही आमदार कदम यांनी सुमारे १३ हजारांचे मताधिक्य घेत दापोली विधानसभेवर भगवा फडकवला. परंतू त्यानंतर झालेल्या उलटपक्षी राजकारणाला कंटाळून त्यांनी दोन वर्षांपूर्वी झालेल्या राजकीय उलथापालथीत शिंदे सरकार सोबत जाण्यात धन्यता मानली. शिवसेनेचे सरकार असतानाही विकासकामांसाठी निधी मिळत नाही. ही त्यांची तक्रार पक्षश्रेष्ठींच्या कानावर जावुनही त्यांची दखल घेतली गेली नाही, ही खंत त्यांनी वारंवार बोलून दाखवली. त्यानंतर भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर दापोली मतदार संघात प्रथमच आल्यावर खेड येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट देत आपण एकत्रितपणे मतदार संघात नांदायचे आहे, असा संदेश दिला. पुढे शिंदे सरकारच्या माध्यमातून त्यांनी या मतदार संघात कोट्यवधींचा निधी आणला. सद्यःस्थितीत ही सर्वच कामे प्रगतीपथावर आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले; परंतु ठाकरे कुटुंबीयांवर झालेला अन्याय आणि मोदी सरकारच्या विरोधात असलेले जनमत व विशिष्ठ समाजाचा असलेला उमेदवार अशा करणांमुळे या मतदार संघात तटकरेंसाठी मताधिक्य देता आले नाही. अशी चर्चा निवडणूक निकालानंतर सुरू आहे. लोकसभा निवडणुकीवरून विधानसभेचा अंदाज बांधणे हे अयोग्य आहे. पण येणाऱ्या विधानसभेत आमदार योगेश कदम यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल हे मात्र लोकसभेच्या निकालाने दाखवून दिले आहे.

----
कोट

भावनिक आणि समाजाचे राजकारण मी कधीच केले नाही. आतापर्यंत विकास, बेरोजगारी आणि मतदार संघातील विविध समस्या यावरच लक्ष केंद्रित केले आहे‌. या निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हांचा उमेदवार या ठिकाणी उभा नव्हता. माजी आमदार हे उबाठामध्ये गेल्यामुळे राष्ट्रवादीचे मताधिक्य या ठिकाणी विशेष राहिलेले नाही. असे असतानाही घड्याळ चिन्हाला ६९ हजार शिवसैनिकांनी मतदान केले. या निवडणुकीत संविधान बदलणार, वाढती महागाई हे मुद्दे विरोधकांनी प्रचारात आणले. मुंबईकर या निवडणुकीत ग्रामीण भागात आलाच नाही. या गोष्टी देखील विचारात घेणे आवश्यक आहे.
- योगेश कदम, आमदार

------------

rat९p२४.jpg-
89016
उदय सामंत

रत्नागिरी विधानसभा मतदार संघ ...........लोगो

इंट्रो

रत्नागिरी-लोकसभा मतदार संघाच्या निकालाने विधानसभा निवडणुकीत महायुतीची राजकीय घडी विस्कटण्याची स्थिती आहे. रत्नागिरी मतदार संघातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे दहा हजार मतांनी पिछाडीवर राहिले. त्याचे खापर स्वाभाविक सामंत कुटुंबीयांवर फोडले गेले. यातूनच राणे आणि सामंत यांचे संबंध काहीसे ताणले आहेत. माजी खासदार नीलेश राणे यांनी तर ट्विट करत थेट रत्नागिरी विधानसभा मतदरा संघावर भाजपचा दावा केला आहे. यात महायुतीची गती मंदावण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे १० हजाराने मताधिक्य वाढल्याने उबाठा शिवसेनेला नवी ऊर्जा मिळाली आहे. महायुतीतल ताणलेले संबंध आणि महाविकास आघाडीची वज्रमुठ आमदार उदय सामंतांना तगडे आव्हान देणारी राजकीय परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
- राजेश शेळके, रत्नागिरी
................
ताणलेले संबंध, आघाडीच्या वज्रमुठीचे सामंतांपुढे आव्हान
भाजप झालाय आक्रमक; पिछाडी भाजपसह राणेंना जिव्हारी

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा रत्नागिरी विधानसभा मतदार संघावर भारी पगडा आहे; पण हा पगडा असूनही राणे येथे पिछाडीवर गेले ही बाब संशय निर्माण करणारी ठरली. आगामी काळात हाच मुद्दा कळीचा ठरणार आहे. २००४ पासून त्यांनी मतदार संघावर घेतलेली पकड चार टर्म मजबूत आहे. सर्वांत जास्त शासकीय निधी आणणाऱ्या आमदारांपैकी ते एक आहेत. त्यामुळे रत्नागिरी शिवसेनेच्या बाले किल्ला असला तरी उदय सामंत दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना निवडून आले होते, ही त्यांची राजकीय ख्याती आहे. या मतदार संघात त्यांनी आपली वेगळी ताकद आणि वैयक्तीक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची फळी उभा केली आहे. शिवसेनेत आयत्यावेळी उडी मारल्यानंतरही त्यांना जास्त मेहनत घ्यावी लागली नाही. या मतदार संघात त्याच्या विरोधात उभा राहणारा तगडा उमेदवारच नाही; परंतु अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली आणि सेनेचे दोन भाग झाले. शिवसेनेचे नाव गेले चिन्ह गेले. या राजकीय घडामोडीमुळे निष्ठावंत शिवसैनिकामध्ये प्रचंड चीड निर्माण झाली. त्यामुळे सामंत यांच्या मतदार संघाच्या ताकदीवर परिणाम झाला. फोडाफोडीच्या राजकारणानंतर प्रथमच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी विधानसभा मतदार संघात वेगळेच चित्र होते. आमदार उदय सामंत हे महायुतीसाठी राबले, असा दावा त्यांनी केला. मतदानात त्याचे चित्र न उमटल्याने संशयाची ठिणगी पडली. संविधान बदलण्याचा महाविकास आघाडीने केलेला प्रचार त्यांना घातक ठरला. बंधूप्रेमदेखील त्यांना या वेळी बाजूला ठेवावे लागले, अशा अनेक घटना घडल्यामुळे ते भाजपच्या डोळ्यावर आले.
रत्नागिरी विधानसभा मतदार संघात २ लाख ८० हजार ९५७ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ७२ हजार १३९ मतदारांनी मतदान केले. रत्नागिरीत राणेंना ७२ हजार मते मिळाली. एवढी मते तर भाजपचीच आहेत, असा दावा माजी आमदार बाळ माने यानी केला. मतांची ही आकडेवारी सामंत यांची डोकेदुखी ठरतेय. सामंतांची ताकद असलेल्या रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून आपल्याला मताधिक्य मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती. सामंत लाखभर मताधिक्य घेऊन निवडून येणाऱ्या या मतदार संघात राणे पिछाडीवर राहिले हे भाजपसह राणेंना जिव्हारी लागले आहे. त्यामुळे विजयानंतरही राणेंच्या तिखट प्रतिक्रिया येऊ लागल्या. दगाफटका दिल्यालांचा हिशोब विधानसभेला चुकता करू, असे राणेंनी स्पष्ट केले.
दोन दिवस झाले नाही तोवर नीतेश राणे यांनी राजापूर मतदार संघावर दावा केला तर दुसऱ्याच दिवशी माजी खासदार नीलेश राणे यांनी रत्नागिरी विधानसभा मतदार संघावर भाजपने दावा केला. त्यांच्या या दाव्यामुळे महायुतील संबंध ताणले गेले. उदय सामंत यांनी यावर संयमाने उत्तर दिले. राणेंचा जो काही गैरसमज झाला आहे तो लवकरच ते दूर करणार आहेत. दुसरीकडे महाविकस आघाडीला या मतदार संघातून १० हजाराचे मताधिक्य मिळाल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मनोबल वाढले आहे. त्यात महाविकास आघाडी मजबूत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीतील ताणलेले संबंध आणि मजबूत महाविकास आघाडीमुळे सामंतांच्या वाट खडतर होण्याची शक्यता आहे.
--------

कोट
लोकसभेच्या निवडणुकीत संविधान बदलाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या अपप्रचाराला प्रत्युत्तर देण्यास आम्ही कमी पडलो. त्याचा परिणाम मतदानावर आणि मुस्लिम समाजावर झाला. निवडणुकीतून बरेच काही शिकलो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला व्याजासहित परतफेड करू.
- उदय सामंत, उद्योगमंत्री रत्नागिरी

.......................
rat९p२९.jpg-
89021
विक्रांत जाधव

गुहागर विधानसभा मतदार संघ .........लोगो

इंट्रो

गुहागर विधानसभा मतदार संघात आमदार जाधव यांनी प्रचाराचे केलेले सुक्ष्म नियोजन, कुणबी समाज व अल्पसंख्यांकांची एकगठ्ठा मते, संविधान बदलणार हे मुद्दे यशस्वी झाले. दुसरीकडे महायुतीने एकजुटीने काम केले तरीही मताधिक्याच्या परीक्षेत ते अयशस्वीच झाले. विकास कामांचा उपयोग मते पारड्यात पडण्यासाठी झाला नाही. खेड खाडीपट्ट्यातील रामदास कदमांचा प्रभाव ओसरल्याचे दिसून आले. याचा परिणाम मतांवर झाला. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपपुढे मोठे आव्हान आहे.
- मयूरेश पाटणकर, गुहागर
--------------------------------------

महायुतीतील भाजपपुढे आव्हान कायम
आघाडी जोषात; विक्रांत जाधवना बूस्टर
आमदार जाधव यांनी जिल्हा परिषदनिहाय बैठका घेऊन गावनिहाय विचार करून नियोजन केले. अनंत गीतेंनी समाजबांधवांना साथ देण्याची विनंती केली होती. संपूर्ण देशातील अल्पसंख्यांक व बौद्ध समाज काँग्रेसच्या मागे उभा राहात होता. त्याचा फायदा करून घेण्यासाठी आमदार जाधव यांनी या दोन समाजगटांसाठी स्वतंत्र रणनीती आखली. साथीला पक्ष फोडल्याचा भावनिक प्रचार होताच. त्यामुळेच अनंत गीतेंनी या मतदार संघात २७ हजार ५९६ चे मताधिक्य मिळवले.
या मताधिक्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीआधी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना उत्साह मिळाला. कुठे कमी पडतो आहोत याची माहिती मिळाली आहे. प्रचारामध्ये मुख्य भूमिका माजी जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांना बजावायला सांगून त्यांच्या आमदारकीची वाट सुलभ होण्यास आमदार जाधव यांनी मदत केली आहे. या निवडणुकीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने, समन्वयाने प्रचार केला. किमान ५ हजारापर्यंतचे मताधिक्य मिळेल, या अपेक्षेच्या जोरावर विधानसभा जिंकण्याचे स्वप्न महायुती पाहात होती. प्रत्यक्षात गीतेंना २७ हजारांचे मताधिक्य मिळाल्याने कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग झाला. निवडणुकीतील आकडेवारी पाहिली तर चिपळूण तालुक्यातील ९२ बूथमध्ये महायुतीला तुलनेत चांगली मते मिळाली. आमदार शेखर निकम यांचा पालवण, वहाळ पट्ट्यावर असलेल्या प्रभावाचे दर्शन झाले. गुहागर तालुक्यातील १४० बूथमध्ये आजही भाजप पाय रोवण्यासाठी संघर्ष करतो आहे तर खेडच्या ९० बूथमधील शिवसेना नेते रामदास कदम यांचा प्रभाव ओसरत चालला आहे का, असा प्रश्न पडण्यासारखी स्थिती आहे. अर्थात, या ९० बूथमध्ये अल्पसंख्यांक मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.

चौकट

तालुका एकूण मतदान अनंत गीते तटकरे गीतेंना मताधिक्य

गुहागर (१४० बूथ) ५६५५५ ३०७१९ २००४३ १०६७६

चिपळूण (९२ बूथ) ३९९७९ १९९३४ १५५९१ ४३४३

खेड (९० बूथ) ३९३४३ २३९७३ ११३९६ १२५७७

एकूण १,३५,८७७ ७४६२६ ४७०३० २७५९६

गुहागर शहर ३८२७ १३३९ २२७० ९३१ (तटकरे)


कोट
तालुक्याच्या जनतेने दिलेला कौल मान्य आहे. आम्ही कुठे कमी पडलो, याचे चिंतन झाले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मुद्दे वेगळे असतात. खोटा प्रचार सातत्याने यशस्वी होत नाही. आता विधानसभेत महायुतीचा आमदार निवडून देण्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत.
- नीलेश सुर्वे, तालुकाध्यक्ष भाजप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com