रत्नागिरी - जिल्हा परिषद कर्मचारी भरती स्थगित
जिल्हा परिषद कर्मचारी भरती स्थगित
निवडणूक आचारसंहिता; विविध संवर्गाच्या ७०० जागा रिक्त
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ः गेले अनेक महिने रखडलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी भरतीला मुहूर्त मिळाला होता. कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्यसेवक यांची लेखी परीक्षा १० जूननंतर होणार होती. तसे वेळापत्रक जाहीर झाले होते; मात्र, कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यामुळे ही परीक्षा स्थगित केली आहे.
जिल्हा परिषद वर्ग ३ व ४ची भरतीप्रक्रिया सहा महिन्यांपूर्वी सुरू झाली. त्यामध्ये विविध संवर्गाच्या ७०० जागा रिक्त होत्या. त्यासाठी भरतीप्रक्रिया होती. यापैकी अनेक जागांसाठी लेखी परीक्षाही घेण्यात आली होती; मात्र मध्यंतरी यातील काही संवर्गातील पदासाठी भरतीवर आक्षेप घेत काही उमेदवार न्यायालयात गेले होते. विशेषत: ग्रामसेवक या पदासाठी न्यायालयात गेले होते. हा विषय न्यायालयाने निकाली काढत भरती करण्याचे आदेश दिले; परंतु त्याच दरम्यान लोकसभा निवडणूक आल्याने ही भरतीप्रक्रिया अडकली. निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर आता ही भरतीप्रक्रिया होणार होती. जिल्हा परिषद गट क संवर्गाच्या १८ पदांच्या ७१५ जागांसाठी ७० हजार ६०८ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यात ग्रामसेवक पदासाठी सर्वाधिक म्हणजे तब्बल ४१ हजार अर्ज दाखल झाले होते. ३ ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू झाली होती.
जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीसाठी मुदतीअखेर ७० हजार ६०८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आरोग्यसेवक दोन पदांसाठी ६४ अर्ज आले आहेत. आरोग्य परिचारिकांच्या भरतीसाठी २२७ जागांसाठी ९३२ अर्ज आले आहेत तर आरोग्यसेवक २२ जागांसाठी ४ हजार ८१५ अर्ज प्राप्त झाले आहेत. आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यांच्या ५२ जागांसाठी १ हजार ५० अर्ज आले होते. औषध निर्माण अधिकार्यांच्या भरतीसाठी ३७ जागांसाठी ४ हजार १९९ अर्ज प्राप्त झाले होते. विस्तार अधिकारी सांख्यिकी ३ जागांसाठी ५६४ अर्ज, विस्तार अधिकारी कृषी ४ जागांसाठी ८११ अर्ज आले आहेत. वरिष्ठ सहाय्यक लिपिक १ जागेसाठी २९९ अर्ज आले होते. पशुधन पर्यवेक्षक ४२ जागांसाठी १ हजार २८६ अर्ज प्राप्त झाले आहेत. कनिष्ठ आरेखक २ जागांसाठी ६१ अर्ज आले आहेत. वरिष्ठ सहाय्यक लिपिक ६८ जागांसाठी ११ हजार ४१ अर्ज तर पर्यवेक्षिका ९ जागांसाठी १ हजार ५४८ अर्ज प्राप्त झाले होते. कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम ग्रामीण पाणीपुरवठा ३१ जागांसाठी १ हजार ५५७ अर्ज आले होते. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक २२ जागांसाठी ७४४ अर्ज आले होते. लघुलेखक उच्चश्रेणी १ जागेसाठी ११७ अर्ज दाखल झाले होते.
ग्रामसेवक पद सोडून इतर पदांसाठी ३ ते ११ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान परीक्षा झाली होती. फक्त ग्रामसेवक, आरोग्यसेवक लेखी परीक्षा राहिली होती. आता ही परीक्षा १० जूननंतर होणार होती. तसे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले होते. आता मात्र कोकण पदवीधर मतदार संघासाठी २६ जूनला मतदान होणार असून, १ जुलैला मतमोजणी होणार आहे. यानंतरच आचारसंहिता संपणार आहे. ही आचारसंहिता संपल्यानंतरच भरतीप्रक्रिया सुरू होणार आहे, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.