रेडी माईन्स कंपनी येथे
वनविभागातर्फे वृक्षारोपण

रेडी माईन्स कंपनी येथे वनविभागातर्फे वृक्षारोपण

89074

रेडी माईन्स कंपनी येथे
वनविभागातर्फे वृक्षारोपण

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ९ ः सावंतवाडी वनविभाग, कुडाळ वनपरिक्षेत्र व मठ वनपरिमंडळ यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. रेडी येथील रेडी आयर्न ओव्हर माईन ऑफ गोगटे मिनरल्स कंपनी येथे आंबा, जाम, डाळिंब, काजू प्रजातीची एकूण ५० रोपांची लागवड करण्यात आली.
यावेळी कुडाळ वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, मठ वनपाल सावळा कांबळे, मठ वनरक्षक सूर्यकांत सावंत, तुळस वनरक्षक विष्णू नरळे, ऑपरेशन महाराष्ट्र राज्याचे प्रमोद सरोदे, गोगटे मिनरल्सचे श्रीनिवास राव, संजय भंडारे आदी उपस्थित होते. वनक्षेत्रपाल कुडाळ यांनी यावर्षीच्या ‘जमीन पुनर्संचित करणे, वाळवंटीकरण आणि दुष्काळी प्रतिकारशक्ती’ या थीमबाबत माहिती दिली. पर्यावरण संतुलनासाठी वृक्षलागवड किती महत्त्वाची आहे हे पटवून दिले. वनपाल मठ यांनी यावर्षीच्या पर्यावरण दिवसाचे घोषवाक्य ‘आमची जमीन, आमचे भविष्य आम्ही आहोत’ असल्याचे सांगितले. मठ येथील शासकीय वन कक्ष क्रमांक १३६ मधील मोकळ्या भागात कोकमची ४०, आवळा ३०, जांभूळ ३० अशी एकूण १०० फळझाडांची लागवड केली. यावेळी कुडाळ वनक्षेत्रपाल कुंभार, मठ वनपाल कांबळे, मठ वनरक्षक सावंत, तुळस वनरक्षक नरळे, मठ वनसेवक पाडावे व ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com