घरावर झाड कोसळून
निगुडे येथे नुकसान

घरावर झाड कोसळून निगुडे येथे नुकसान

89090
घरावर झाड कोसळून
निगुडे येथे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ९ ः निगुडे जुनी देऊळवाडी येथील अंकुश निगुडकर यांच्या घरावर आज पहाटे चारच्या सुमारास जांभळाचे झाड पडल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घराच्या बाजूला असणाऱ्या नारळाच्या झाडामुळे जांभळाचे झाड पूर्णतः घरावर पडले नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घरामध्ये अंकुश निगुडकर व त्यांचे कुटुंबीय लहान मुलांसह राहतात. पहाटेच्या सुमारास झाड पडताना मोठ्याने आवाज आल्यामुळे लहान मुले घाबरली. रात्री संततधारपणे पाऊस कोसळत असल्यामुळे हे झाड घरावर पडले. निगुडकर यांचा मुलगा रमाकांत निगुडकर यांनी या घटनेची कल्पना निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर यांना दिली. सरपंच यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तलाठ्यांना नुकसानीची माहिती देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com