वृद्धाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

वृद्धाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

वृद्धाकडून अल्पवयीन
मुलीचा विनयभंग
रत्नागिरी, ता. ६ः शाळेत परीक्षेचा निकाल घेण्यासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा वृद्धाने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुलीने आरडाओरडा केल्याने शिक्षक व नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली व मुलीची सुटका केली. शहर पोलिसात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती. न्यायालयाने संशयिताची ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. रामचंद्र शंकर शिवलकर (६५) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ३० एप्रिल २०२४ घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी आपल्या लहान बहिणीचा निकाल घेण्यासाठी शाळेत गेली होती. शाळेसमोरील रस्त्यावरुन जात असताना संशयिताने तिचा विनयभंग केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com