विनामूल्य झाडांसाठी
शाळांना आवाहन

विनामूल्य झाडांसाठी शाळांना आवाहन

विनामूल्य झाडांसाठी
शाळांना आवाहन
ओटवणे ः नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने सिंधुदुर्गातील जिल्हा परिषद शाळा व हायस्कूलना नारळ, पोफळी आदी झाडे विनामूल्य दिली जाणार आहेत. या उपक्रमाच्या वृक्ष बँकेतील उपलब्धतेनुसार शाळांना झाडे पुरविण्यात येणार असून प्रत्येक शाळेने आपल्याला लागणाऱ्या झाडांची संख्या कळवावी, असे आवाहन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने केले आहे. या उप्रमासाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेतर्फे वृक्ष बँक तयार केली आहे. उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हा संघटक गणेश नाईक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे राज्य महासचिव बापू परब यांनी केले आहे.
----
‘प्रवेशासाठी नोंदणी
करणे आवश्‍यक’
दोडामार्ग ः शैक्षणिक वर्ष २०२४ मध्ये बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीएसस्सी मुंबई विद्यापीठ अंतर्गत कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी सर्वप्रथम muugadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावर सोमवारी (ता. १०) पूर्वी नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय मुंबई विद्यापीठांमध्ये प्रथम वर्ष बीए, बी. कॉम, बीएसस्सीसाठी प्रवेश होणार नाही, याची नोंद घ्यावी असे आवाहन लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालय दोडामार्गचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी केले आहे. शिवाय तालुक्यातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नोंद घेऊन १० जूनच्या अगोदर प्रवेश निश्चित करावा, असेही डॉ. सावंत यांनी म्हटले.
---
धैर्य कोळमेकरचे
टॅलेंट सर्चमध्ये यश
ओटवणे ः भारत टॅलेंट सर्च (बीटीएस) परीक्षेत माडखोल धवडकी शाळा नं. २ मे उज्ज्वल यश मिळविले असून धैर्य दत्ताराम कोळमेकर याने ९२ गुणांसह राज्यात चौथा येण्याचा बहुमान मिळविला आहे. या परीक्षेत प्रांजल मुरकर ६८ गुण, रामभाऊ गावकर ६२ गुण, आत्माराम देसाई ५२. गुण मिळविले. विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका भावना गावडे, शिक्षक अरविंद सरनोबत, समीक्षा राऊळ आदींनी अभिनंदन केले.
-------------------
सावंतवाडीत उद्या
सेवानिवृत्त सभा
सावंतवाडी ः सावंतवाडी-दोडामार्ग तालुका निवृत्त कर्मचारी संघटनेची मासिक सभा मंगळवारी (ता.११) सकाळी १०.३०. वाजता संघटनेच्या कार्यालयात आयोजित केली आहे. या बैठकीला संघटनेचे सर्व संचालक, सल्लागार व सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पणदूरकर व सचिव संभाजी कांबळे यांनी केले आहे.
------------
इलेक्ट्रिक मोटार
ट्रेलरमधून चोरीस
कणकवली ः ट्रेलरमध्ये ठेवलेली जुनी साधारण १५ हजारांची इलेक्ट्रिक मोटार चोरीस गेल्याची फिर्याद कणकवली पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com